भारतीय संघाचा ऑलराउंडर स्टार हार्दिक पांड्या मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टेनकोविच हिला अनोख्या पद्धतीने प्रपोज करत केली Engagement (Video)
नाताशा आणि हार्दिक पांड्या (Photo Credits-Instagram)

भारतीय संघाचा ऑलराउंडर स्टार हार्दिक पांड्या याने त्याच्या चाहत्यांना नवं वर्षाच सरप्राईज दिले आहे. तर हार्दिक याने अभिनेत्री, मॉडेल नताशा स्टेनकोविच हिला अनोख्या पद्धतीने प्रपोज केले आहे. या दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून नताशा सोबत इन्गेजमेंट करत नात्यात अडकला आहे. नताशा हिला हार्दिकने दुबईत समुद्रात प्रपोज केले आहे. 31 डिसेंबरला रात्री हार्दिकने नताशा सोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र त्यावेळी इन्गेजमेंटबाबत काही खुलासा केला नव्हता.

हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर नताशा सोबतचे फोटो शेअर करत 'मै तेरा, तू मेरी जान सारा हिंदुस्थान 01.01.2020 #engaged' असे कॅप्शन लिहिले आहे. या दोघांचे फोटो पाहुन अनेकांच्या नजरा या दोघांच्या नात्याकडे वळल्या गेल्या आहेत. नताशा आणि हार्दिक यांच्या नात्याबाबत ऑगस्ट 2019 पासून चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच बऱ्याच वेळा या दोघांना एकमेकांसोबत पाहण्यात आले होते. एवढेच नाही तर नच बलिये 9 या डान्सशोच्या माध्यमातून झळकलेल्या नाताशा हिच्यासाठी वोट करण्याचे अपील सुद्धा त्याने केले होते.

 

View this post on Instagram

 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 👫💍 01.01.2020 ❤️ #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

Instagram Post:

(हार्दिक पंड्या याने गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविच बरोबर नवीन वर्षाचे केले स्वागत, सोशल मीडियावर केली नात्याची पुष्टी, पाहा Photo)

 

View this post on Instagram

 

Forever yes 🥰💍❤️ @hardikpandya93

A post shared by 🎀Nataša Stanković🎀 (@natasastankovic__) on

नताशा ही मूळची सर्बिया येथील असून वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून तिने डान्स शिकण्यास सुरुवात केली. 17 व्या वर्षात डान्स मध्ये करियर बनवण्यासाठी मॉर्डन स्कूल ऑफ बॅले मध्ये प्रशिक्षण घेतले. 2010 मध्ये मिस स्पोर्ट्स सर्बिया या पुरस्काराने सुद्धा नताशा हिला गौरवण्यात आले आहे. 2012 मध्ये नताशा हिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकत सत्याग्रह या चित्रपटातून आयटम सॉन्ग हमरी अटरिया मधून झळकली होती.