हार्दिक पंड्या याने गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविच बरोबर नवीन वर्षाचे केले स्वागत, सोशल मीडियावर केली नात्याची पुष्टी, पाहा Photo
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच (Photo Credit: Instagram)

टीम इंडियाचा अष्टपैलू स्टार खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) देखील बाकी खेळाडूंप्रमाणेच कुटुंब आणि मित्रांसह नवीन वर्ष साजरा करत आहे. महेंद्र सिंह धोनीबरोबर इंस्टाग्रामवर स्टोर शेअर केल्यानंतर हार्दिकने सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) हिच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला. हार्दिक आणि नताशाच्या नात्याबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. या फोटोमध्ये हार्दिकने नताशाचा हात धरला आहे. हार्दिकने हा फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. हार्दिक आणि नताशाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हार्दिकने नताशासह शेअर केलेला हा फोटो पाहून त्यांनी आपल्या नात्याची पुष्टी केल्याचे म्हटले जात आहे. ऑगस्ट 2019 पासून हार्दिक आणि नताशाविषयीच्या बातम्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. दोघांना बर्‍याचदा एकत्र पाहिले गेले होते आणि तेव्हापासून दोघांच्या नात्याबद्दलच्या अफवाफ जोर धरू लागल्या. अशी बातमीदेखील समोर आली की हार्दिकने नताशाला आपल्या कुटूंबाशी ओळख करुन दिली आहे, परंतु दोन्ही बाजूंकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. (New Year 2020: वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांच्यासमवेत दिग्गज खेळाडूंनी खास अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा)

आता नवीन वर्षाचे अभिनंदन करताना हार्दिकने नताशाबरोबर फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना करत हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या फायरवर्कसोबत नवीन वर्षाची सुरुवात." या फोटोमध्ये हार्दिक आणि नताशा एकमेकांचे हात धरले आहेत. यासह हार्दिकने हृदयाची इमोजीही तयार केली आहे. हार्दिकच्या या फोटोवर युजवेंद्र चहल, अर्जुन कपूर, पंखुरी शर्मा, सिद्धेश लाड, पूर्णा पटेल, सोफी चौधरी, क्रिस्टल डिसूझा यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. या फोटोनंतर हार्दिक आणि नताशाचे नाते अधिकृत मानले जात आहे. पाहा हा फोटो:

 

View this post on Instagram

 

Starting the year with my firework ❣️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकच्या 26 व्या वाढदिवशी नताशा स्टॅनकोविचने इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी संदेश पोस्ट केला होता. यानंतर दोघेही डेटिंग करत असल्याची चर्चा होती. नताशा यापूर्वी अभिनेता अली गोनीसोबत नात्याचे होती. त्याच्यासह तिने 'नच बलिये' टीव्ही शो देखील केला होता. हार्दिकने नताशासाठी वोटिंगची देखील अपील केली होती. हार्दिकचे नाव यापूर्वी अभिनेत्री एशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशी जोडले गेले होते.