New Year 2020: वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली यांच्यासमवेत दिग्गज खेळाडूंनी खास अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Virat Kohli and Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

2020 वर्षाची सुरुवात झाली आहे आणि एक नवीन दशक उत्सवासाठी तयार आहे. जगभरातील प्रसिद्ध खेळाडूंनी त्यांच्या स्वत:च्या मार्गाने नवीन वर्षाचे स्वागत केले, काहींनी त्यांच्या कुटूंबियांसह, काहींनी चाहत्यांसह काही क्षण शेअर केले तर काहींनी 2019 साठी आभार मानले. नवीन वर्षात, 24 जुलैपासून टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वात मोठा मल्टि-स्पोर्ट इव्हेंट होणार आहे आणि गेल्या काही वर्षांत अनेक यशस्वी कामगिरीनंतर भारताला जास्त पदकं जिंकण्याची संधी आहे. त्याआधी भारतीय महिला संघ हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात फेब्रुवारी-मार्चमध्ये टी-20 विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियाचा दौरा करतील. यानंतर विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरूष संघ ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी डाऊन अंडरचा दौरा करतील. वर्षाखेरीस भारत ऑस्ट्रेलियाबरोबर कसोटी मालिकेतही खेळेल. इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्येही बघायला खूप काही असेल.

अभिनेता-पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह एक व्हिडिओ पोस्ट करून कोहलीने नवीन वर्षाच्या उत्सवाचे स्वागत केले. व्हिडिओमध्ये विराट म्हणतो, "आम्ही येथे सुंदर हिमशिखराच्या मध्यभागी आहोत, त्यामुळे आम्हाला असे वाटते की तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा अगोदर देण्यात याव्या." यानंतर अनुष्का म्हणाली, 'हो, आम्हाला आशा आहे की 2019 हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले असेल आणि पुढील वर्षदेखील खूप चांगले होईल अशी प्रार्थना." विराटशिवाय अन्य खेळ जगतातील अन्य दिग्गज खेळाडूंनीही सोशल मीडियावरून चाहत्यांना यानंतर अनुष्का म्हणाली, 'हो, आम्हाला आशा आहे की 2019 हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले शुभेच्छा दिल्या. भारतीय शटलर पीव्ही सिंधू आणि अश्विनी पोनप्पा यांनीही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

पीव्ही सिंधू

अश्विनी पोनप्पा

वीरेंद्र सहवाग

व्हीव्हीस लक्ष्मण

मोहम्मद कैफ

सुरेश रैना

सायना नेहवाल

खेळ विश्वासाठी यंदाचे वर्ष महत्वाचे असणार आहे. महिलांसह पुरुष क्रिकेट संघदेखील टी-20 विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात असतील. शिवाय, यंदा टोकियोमध्ये ऑलिम्पिकचे आयोजनही होणार आहे. भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, रनिंग, भाला फेक आणि अन्य खेळांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे, त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.