Anurag Worlikar Engagement: मराठी सिनेसृष्टीत कलाकारांची लगीन घाई होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी प्रसाद- अमृताने थाटामाटात लग्न केलं होतं. सोशल मीडियावर दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले होते. आता 'दे धमाल' आणि 'पोरबाजार' फेम अनुराग वरळीकराचं (Anurag Worlikar) साखरपुडा झाल्याची चर्चा होतं आहे. अनुराग वरळीकरने त्याची जवळची मैत्रीण पायल साळवीबरोबर लग्न करणार आहे. अनुरागने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदी बातमी दिली आहे.
दोघांचे साखरपुडाचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. फोटो पाहून चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी कंमेट केले आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत त्याला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले आहेत. दरम्यान फोटो पाहून अभिनेत्री स्पृहा जोशी हीन देखील एक कमेंट केली आहे. या कंमेटने सर्वाचं लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
स्पृहा म्हणाली की, सुराला कच्चा आहे.. पण मुलगा चांगला आहे!खूप खूप अभिनंदन अनुराग!" स्पृहा जोशीची ही कंमेट पाहून नेटकऱ्यांना स्पृहा आणि अनुरागच्या 2019मध्ये एकत्र केलेल्या एका जाहिरतीची आठवण झाली आहे. दोघांनी एका नामांकित विवाहसंस्थेच्या जाहिरातीत काम केलं होतं. यामध्ये सुराला कच्चा आहे.. पण मुलगा चांगला आहे ! असा डायलॉग होता. अनुरागने अनेक चित्रपटात काम केली आहे. जसं की बारायण, देवकी त्याबरोबर डॉक्टर डॉन या मालिकेत महत्त्वाची भुमिका पार पाडली.