Lok Sabha Elections 2019: काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) पक्षात करणारे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी (22 एप्रिल) रात्री पक्षाने दोन उमेदवाऱ्यांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये नवी दिल्ली येथून मीनाक्षी लेखी आणि पूर्व दिल्ली (East Delhi) येथून गौतम गंभीर यांना उमेदवारी दिली आहे.
पक्षात प्रवेश केल्यानंतर गौतम गंभीर यांना लोकसभा निवडणुक लढवण्याची संधी मिळेल अशी शक्यता होती. तसेच गौतम गंभीर यांनी नेहमीच सामाजिक प्रश्नावर आपली भुमिका मांडली आहे. भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशासाठी जे लक्ष आहे त्यामुळे प्रभावित असल्याचे म्हटले होते.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: माजी क्रिकेटर गौतम गंभीर याचा 'भाजप'मध्ये प्रवेश)
दिल्ली येथे लोकसभेसाठी एकूण 7 जागा आहेत. तर सोमवारी भाजपने दिल्लीतून पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये पुन्हा चार जणांना पक्षाने तिकिट दिले. तर केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांना चांदनी चौक आणि मनोज तिवारी यांना उत्तर पूर्वी दिल्ली येथून तिकिट देण्यात आले आहे.