52 व्या रोहित शर्माच्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर डेन पीटने दोन धावा घेत आपले अर्धशतकही पूर्ण केले आहे. पीटचे टेस्टमधील हे पहिले अर्धशतक आहे.
SA 190/9 in 63 Overs| IND vs SA 1st Test Day 5 Live Score Updates: भारत विजयापासून 1 विकेट्स दूर
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात आज पहिल्या टेस्ट मॅचच्या अंतिम दिवससचा खेळ खेळण्यात येईल. चौथ्या दिवशी पूर्ण दिवस फलंदाजी करत टीम इंडियाने विजयासाठी आफ्रिकेला 394 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर, चौथ्या दिवसाचा खेळ पूर्ण होईपर्यंत आफ्रिकेने 1 विकेट गमावत 11 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात आफ्रिकेसाठी दुहेरी शतक करणारा डीन एल्गार (Dean Elgar) याला दुसऱ्या डावात फक्त 2 धावा करता आल्या. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने एल्गारला बाद करत संघाला मोठे यास मिळवून दिले. आता, पाचव्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 9 विकेट्स, तर आफ्रिकेलाअजून 384 धावांची गरज आहे. भारताने पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मजबूत केली आहे.
आजच्या मॅचमध्ये रविचंद्रन अश्विन याच्यावर सर्वांची नजर असणार आहे. आजच्या सामन्यात एक विकेट घेत अश्विन माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मॉडेल तर दुसरीकडे, मुथय्या मुरलीधरन यांची बरोबरी करू शकतो. आजची एक विकेट अश्विनच्या टेस्ट करिअरमधील सर्वात जलद 350 वी विकेट असणार आहे.
भारताने त्यांचा दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला. भारताच्या डावात पुन्हा एकदा रोहित शर्मा याने शतकी खेळी केली. पहिल्या डावात रोहितने दीडशे धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो 127 धावांवर बाद झाला. रोहितने 133 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह आपले दुसरे शतक पूर्ण केले. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डाव्य़ातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघ 431 धावांवर बाद झाला. त्यामुळे, भारताला 71 धावांची आघाडी मिळाली होती. मात्र, दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित आणि मयंक अग्रवाल यांना चांगली सुरुवात करता आली नाही. मयंक केवळ 7 धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहितने अर्धशतकी खेळी केली आणि चेतेश्वर पुजारा सह शतकी भागिदारी केली. त्यानंतर, पुजारा 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा याने 40 धावांची आक्रमक खेळी केली. तर कर्णधार विराट कोहली याने नाबाद 31 आणि अजिंक्य रहाणे याने नाबाद 27 धावांची खेळी केली.