भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात आयसीसी (ICC) विश्वकपमधील 38 वा सामना बर्मिंगहॅम (Birmingham) येथील एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जात आहे. या सामन्याच्या टॉस जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करत इंग्लंडने 50 षटकात 6 विकेट गमावून 356 धावा केल्या. भारताने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय शंकर (Vijay Shankar) च्या जागी रिषभ पंत (Rishabh Pant) ला संधी दिली आहे. शंकरच्या पायाला दुखापत झाल्यानं त्याला विश्रांती देण्यात आली आहे. टॉस दरम्यान कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने शंकर दुखापतीमुळे हा सामना खेळात नसल्याचे सांगितले. (IND vs ENG, ICC World Cup 2019: इंग्लंड चे टीम इंडिया समोर 338 धावांचे आव्हान, मोहम्मद शमी च्या 5 विकेट)
दरम्यान, माजी भारतीय फिरकीपटू मुरली कार्तिक (Murali Karthik) यांनी ट्विट करत विजय शंकरच्या दुखापतीबद्दल कोहली यांच्या निवेदनावर प्रश्न उचलला आहे. कार्तिक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर ट्विट करत लिहिले, "जर विजय शंकरच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे आणि यामुळे तो खेळत आहे, मग मैदानावर धावत ड्रिंक्स कसा घेऊन येत आहे? दुसरा कोणी खेळाडू हे का करत नाहीत."
If Vijay Shankar has a toe niggle and that's the reason not to play why is he running drinks.. No one else there to do that job.. 🤫.. #CWC19
— Kartik Murali (@kartikmurali) June 30, 2019
विजय शंकरने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सामन्यातुन विश्वकप मध्ये पदार्पण केले होते. शंकरने पाकिस्तानविरूद्ध 15 धावा काढल्या होत्या तर 2 विकेट्स ही घेतले होते. मात्र, अफगाणिस्तान (Afghanistan) आणि वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध तो काही खास करू शकला नाही. अफगाणिस्तानाविरुद्ध शंकर 30 तर वेस्ट इंडीज विरुद्ध फक्त 14 धावा करत बाद झाला होता. शिवाय या दोन्ही सामन्यात विजयने गोलंदाजी केली नाही.