IND vs ENG, ICC World Cup 2019: इंग्लंड चे टीम इंडिया समोर 338 धावांचे आव्हान, मोहम्मद शमी च्या 5 विकेट

आयसीसी (ICC) विश्वकपच्या 38 व्या सामन्यात भारत (India)-इंग्लंड (England) मध्ये लढत होत आहे. या सामन्यात टॉस जिंकत इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड ने भारतासमोर 338 धावांचे मोठे आव्हान दिले आहे.  बेन स्टोकच्या 79 धावांच्या जोरावर इंग्लंडनं 337 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या सलामीवीर जेसन रॉय (Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) ने भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून आपले वर्चस्व राखले. मात्र, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने भारताला पहिले यश मिळवून दिले. जेसॉन रॉय 66 धावांवर बाद झाला. सलामीला आलेल्या बेअरस्टो ने आपले विश्वकप मध्ये आपले पहिले शतक ठोकले. रॉय बाद झाल्यानंतर मैदानात सध्या जो रूट फलंदाजीसाठी आला आहे. बेअरस्टो 111 धावा करत बाद झाला. (ICC World Cup 2019: IND vs ENG सामन्यात विराट कोहली ला रेकॉर्ड खेळी करण्याची संधी, जाणून घ्या)

त्यानंतर फलंदाजीला आलेला इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्ग (Eoin Morgan) ला मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने माघारी धाडले. मॉर्गन 1 धावा करत बाद झाला. त्यानंतर रूट आणि बेन स्टोक (Ben Stokes) यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली फलंदाजी केली. मात्र, शमीनं पुन्हा एकदा इंग्लंडला एक झटका देत रूट 44 धावांवर बाद झाला. शमीनं वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

भारतासाठी शमी ने 10 ओव्हरमध्ये 70 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. भारत-इंग्लंड मधील सामना दोन्ही सामना महत्वाचा आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित होईल, तर इंग्लंड ला सेमीफायनलमध्ये पोहचण्यास आजचा सामना जिंकणे जरूरी आहे. आजचा सामना ठरल्यास यजमान देशाचे सेमीफाइनलमध्ये जाण्याचे स्वप्न संपुष्टात येईल.