India Vs Australia 3rd Test:  ऑस्ट्रेलियाविरुद्ध रवींद्र जडेजाचे विकेटमधील अर्धशतक पूर्ण
रविंद्र जडेजा (फोटो सौजन्य-PTI)

India Vs Australia 3rd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये फिरकीपटू रवींद्र जडेजाचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. तर ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज 120 धावांवर बाद झाले आहेत. तसेच जसप्रीत बुम्रा याची गोलंदाजी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (82) आणि चेतेश्वर पुजारा (106) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावामध्ये 7 बाद 433 धावा काढल्या. तर रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करुन भारतीय संघात दमदार वापसी केली आहे. दुसऱ्या दिवशीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने बिनबाद 8 धावा केल्या असून तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांची उत्तम कामगिरी दिसून आली.

रवींद्र जडेजाने तिसऱ्या दिवशी ख्वाजाची विकेट घेत पराक्रम केला. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातील जडेजाची ही 50 वी विकेट ठरली आहे. तसेच आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला सुरुवात झाली आहे.