IND vs PAK, ICC World Cup 2019: आऊट नसतानाही विराट कोहलीने सोडले मैदान, भडकले फैंस
(Image Credit: @piersmorgan/Twitter)

विश्वकप 2019 मध्ये भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) चे झंझावाती शतक आणि के. एल राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली मोहम्मद आमीरच्या (Mohammad Amir) गोलंदाजीवर झेलबाद झाला. खरंतर रिव्ह्यूमध्ये तो झेलबाद नसल्याचं दिसत होतं परंतु तोवर उशीर झाला होता कारण कोहली ड्रेसिंग रूमकडे निघाला. ()

मात्र, असे होताच चाहते मात्र निराश झाले. सोशल मीडियावरही याची चर्चा सुरु झाली. बरेच जण आश्चर्यचकित झाले की कोहलीने असे का केले तर दुसरीकडे काही लोकं कोहलीवर चक्क भडकले.

कोहलीकडून आमिरसाठी फादर्स डे च गिफ्ट

विराट कोहलीला आमिरचा सामनाच करायचा म्हणूनच त्याने डीआरएस घेतलेला नाही

तत्पूर्वी, के. एल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत शतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहितसोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या.