ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या सामन्यावर पाऊसच विजयी झाला. आजचा सामना ट्रेंट ब्रीज स्टेडियमवर खेळवला जाणार होता पण पावसाच्या सतत व्यत्ययामुळे विश्वकप मध्ये आजचा सामना हि रद्द करण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड हे विश्वरूप मधील बलाढ्य संघ आहे. न्यूझीलंडच्या संघानं आतापर्यंत तीनही सामने जिंकले आहेत, त्यामुळं गुणतालिकेत ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, भारताचा संघ दोन सामने जिंकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. (World Cup 2019: तुम्हाला जमणार नाही हे! IND vs NZ सामना लांबणीवर गेल्याने चाहत्यांनी उडवली ICC ची खिल्ली)
आजचा सामना रद्द झल्यामुळे दोन्ही संघाना १-१ गुण देण्यात आलेले आहे. याच बरोबर न्यूझीलंड 3 सामन्यातील विजयासह अव्वल क्रमांकावर आहे. भारत विरुद्धचा सामना रद्द झाल्याने त्यांना एक गुण मिळाला. त्या खालोखाल ऑस्ट्रेलिया 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर भारत दोन विजय आणि पावसाने रद्द झालेल्या सामन्यातील एक गुण असे मिळून 5 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. आयसीसी World Cup 2019 आतापर्यंत सर्वाधिक सामने रद्द होणारा वर्ल्ड कप ठरला आहे.
भारताचा पुढचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघाशी होईल. आजचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तान विरुद्ध चा सामना पाण्याखाली जाऊ नये असं साकडं चाहते देवाकडे घालताहेत