IND vs ENG 4th Test: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्यात केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या दुसऱ्या डावात भक्कम सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी झाली. इंग्लिश संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) भारताची ही जोडी मोडली. जेम्स अँडरसनने केएल राहुलला 34 व्या षटकात 46 धावांवर माघारी धाडले. केएल राहुलने जेम्स अँडरसनच्या चेंडूवर राहुलच्या विकेटच्या मागे झेल दिला. इंग्लंडच्या खेळाडूंच्या आवाहनावर पंचाने त्याला नाबाद घोषित केले होते. यानंतर इंग्लंडने रिव्ह्यू घेतला आणि थर्ड अंपायरने त्याला आउट घोषित केले. तथापि केएल राहुल यावर नाराज दिसला. (Rohit Sharma Records: रोहित शर्माचा आणखी एक धमाका, 11 हजार धावा ठोकून सचिननंतर बनला सर्वोत्तम ओपनर; गावस्कर-हेडनसारख्या दिग्गजांनाही पछाडले)
राहुलला बाद दिल्याने भारतीय चाहते मात्र संतापले आणि त्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. चाहत्यांनी यासाठी थर्ड अंपायरला दोष दिला आणि आउट देण्यावर प्रश्न उपस्थित केले. केएल राहुलने 34 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या बॅटच्या बाजूने निघून विकेटकीपर जॉनी बेअरस्टोच्या हातात गेला. यावर इंग्लंडने त्याच्याविरोधात पण झटपट अपील केले पण फील्ड अंपायरने राहुलला नाबाद घोषित केले. यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने लगेच डीआरएस घेतला. थर्ड अंपायरने स्निको मीटरची मदत घेतली आणि दाखवले की जेव्हा चेंडू बॅटच्या बाजून जात होता तेव्हा स्नीको मीटरच्या ओळींमध्ये हालचाल होती. यानंतर थर्ड अंपायरने लगेच राहुलला आउट केले. मात्र बॅट राहुलच्या मागील पॅडवर आणि चेंडू व बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला. आतच नाही तर कॉमेंट्री करत असलेले माजी कर्णधार सुनील गावस्करही यामुळे नाराज झाले आणि त्यांनी तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेतला.
खराब अम्पायरिंग आहे
Why Not @ECB_cricket using Hot Spot , here it was @klrahul11 's bat that hitting his pad not the ball hit his bat . It's very poor umpiring , @ICC should look after these kind of things . @ESPNcricinfo @cricbuzz @SkyCricket @bhogleharsha @BCCI @ShaneWarne #ENGvIND #KLRahul
— Sk Ruhul Amin 🇮🇳 (@iam_SkRuhul) September 4, 2021
खूप खूप खराब!
India low Ioosing their first wicket.
Well played by #KLRahul under pressure..
Very very poor umpire 👎👎#ENGvIND #INDvENG pic.twitter.com/2GtnpolpiM
— virat Akhil Hari (@ViratAkhilHari1) September 4, 2021
हॉटस्पॉट का नाही वापरत?
Why don't we use hotspot technology anymore.. it could provide better insight in #klrahul dismissal.. @bhogleharsha
— aman garg (@aman1787) September 4, 2021
थर्ड अंपायरने निर्णय घेण्यासाठी एक सेकंदही घेतला नाही...
Umpire didn't hear anything from bat and snicko showing that big a spike, clearly bat hitting pad made that happen, third umpire didn't even take a sec to make decision. #ENGvIND#KLRahul #ENGvsIND pic.twitter.com/IbhKuWWxAF
— Manish Bhagat (@Manishbhagat27) September 4, 2021
टीम इंडियाने पहिल्या दिवशी केलेल्या 191 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 290 धावांपर्यंत मजल मारली आणि 99 धावांची आघाडी घेतली. यानंतर राहुल आणि रोहितच्या सलामी जोडी संघाला जोरदार सुरुवात करून दिली पण तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ब्रिटिश संघ ही जोडी तोडण्यात यशस्वी झाला.