ICC World Cup2019: या दोन संघात रंगेल फायनल ची लढत, Google CEO पिचाई च 'सुंदर' भाकीत
(Photo Credits: ANI)

विश्वचकाच्या निमित्ताने का होईना संपूर्ण देशात क्रिकेट फिव्हर पाहायला मिळतोय. याच पार्शवभूमीवर कित्येक जणांनी कोणते चार संघ उपांत्य फेरीत जाणार, अंतिम सामन्यात कोण दोन संघ भिडणार, विश्वचषक कोण जिंकणार, याबद्दल प्रत्येकानी अंदाज वर्तवला आहे. गुगल (Google) चे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichi) यांनीदेखील अंतिम सामन्याबद्दल भाकीत केलं आहे. (IND vs NZ, ICC World Cup 2019: पावसाची इंनिंग्स सुरूच, भारत-न्यूझीलंड सामना रद्द)

भारत (India) आणि इंग्लंड (England) मध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना होईल, असा अंदाज पिचाईंनी एका पुरस्कर सोहळ्यात वर्तवला. पिचाई च्या मते इंग्लंड मध्ये खेळणारा भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. शिवाय त्यांनी विराट कोहली आणि संघाला शुभेच्छा हि दिल्या. करोडो चाहत्यां प्रमाणेच भारताने विश्वकप जिंकावा अशी पिचाई यांची देखील इच्छा आहे.

सध्या, ICC च्या गुणतालिका बघितली तर, न्यूझीलंड चा संघ 3 सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड 4 गुण आणि भारताकडे  5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताने आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती. न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.