Surya Kumar Yadav, Ishan Kishan (Photo Credit: Twitter)

Indian Cricketers Who Can Debut in 2021: श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, केएल राहुल आणि कुलदीप यादव या खेळाडूंनी हे सिद्ध केले आहे की, भारतीय संघ एका चांगल्या भविष्याकडे वाटचाल करत आहे. तसेच युएईमध्ये पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली आहे. दरम्यान, शिवम मावी (Shivam Mavi), सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), ईशान किशन (Ishan Kishan), रवी बिश्नोई (Ravi Bishnoi), कमलेश नगरकोटी (Kamlesh Nagarkoti) , या खेळाडूंनी चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत. यामुळे 2021 मध्ये हे सर्व खेळाडू भारतीय क्रिकेट संघात खेळताना दिसतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवम मावी-

शिवम मावी या युवा खेळाडूने आयपीएलच्या तेराव्या हंगामात जोरदार प्रदर्शन करून दाखवले होते. दुखापतीमुळे संघाबाहेर पडलेल्या शिवमने संघात परतल्यानंतर आक्रमक गोलंदाजी केली. तसेच आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये कोलकाता संघाने जागा मिळवली होती. यात शिवमने मोलाचा वाटा उचलला होता. आयपीएलमध्ये शिवमने 8.92 च्या सरासरीने 17 सामन्यात 14 विकेट्स घेतली आहेत. (वाचा - 6 Cricketers Who Played For Another Countries: जन्मले एका देशात पण खेळले दुसऱ्या देशासाठी; हे 6 क्रिकेटर कोण आहेत? घ्या जाणून)

ईशान किशन-

आयपीएल तखाडेबाज फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ईशान किशन याचेही नाव येते. आयपीएलच्या मागील काही ईशान किशन सर्वोकृष्ट खेळ करून दाखवला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्सच्या संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. या स्पर्धेत त्याने 145 च्या सरासरीने 516 ठोकल्या होत्या.

सुर्यकुमार यादव-

सुर्यकुमार यादव आयपीएलच्या गेल्या अनेक हंगामापासून मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळत आहे. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीची सर्वत्र चर्चा आहे. सुर्यकुमार यादवने मागील हंगामात 16 सामने खेळले असून 480 धावा केल्या होत्या. दरम्यान, सुर्यकुमार यादवला भारतीय संघात कधी संधी मिळेल? असा प्रश्न खेळाडूंसह अनेकजण उपस्थित करत होते.

कमलेश नगरकोटी-

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दाखवणाऱ्या वेगवान गोलंदाज म्हणजे कमलेश नगरकोटीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. दुखापतीनंतर तब्बल दोन वर्षांनी संघात स्थान मिळवलेल्या कमलेश नगरकोटीने चांगली कामगिरी बजावली आहे. यामुळे 2021 मध्ये त्याला भारतीय संघात जागा मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

रवी बिश्नोई-

रवी बिश्नोई हा आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला मिळालेले उत्तम गोलंदाज आहे. त्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामात 14 सामने खेळून 12 विकेट्स घेतल्या होत्या. सध्या कुलदीप यादव भारतीय संघात संघर्ष करताना दिसत आहे. यामुळे येत्या काही काळातच रवी बिश्नोईला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.