आज,गुरुवारी 25 जून रोजी फीफा (FIFA) तर्फे अधिकृत घोषणा करून 2023 महिला विश्वचषक (Women's World Cup 2023) स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलँड (New Zealand) तर्फे केले जाईल असे सांगण्यात आले. जपानने (Japan) आपला प्रस्तवा अगोदरच मागे घेतल्याने, तसेच ब्राझील (Brazil) अर्जेंटिना (Argentina) ने आपला प्रस्ताव रद्द केल्यावर केवळ कोलंबिया (Colombia) आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड यांच्यात निवड करायची होती. यामध्ये फिफा कमिटीने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड ला एकत्रित आयोजन करण्याची परवानगी दिली आहे.
फीफा महिला विश्वचषकासाठी 10 जुलै ते 20 ऑगस्ट 2023 हा कालावधी ठरवण्यात आला आहे. यंदाचा हा नववा महिला विश्वचषक असेल मागील वर्षी फ्रान्समधील फिफा विश्वचषकात 24 संघानी सहभाग घेतला होता येत्या विश्वचषकात मात्र पहिल्यांदाच 32 संघ सहभागी होणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संयुक्त प्रस्तावात ऑकलंडच्या ईडन पार्क येथे आणि सिडनीमधील अंतिम सामन्यासह जुलै आणि ऑगस्ट 2023 मध्ये 12 शहरांमधील 13 ठिकाणी सामने खेळवण्यात येतील असे सांगितलेले आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये सात तर न्यूझीलंडमध्ये पाच सामने रंगणार आहेत.
FIFA ट्विट
Congratulations @FFA & @NZ_Football!
YOU will host the #FIFAWWC 2023.
¡Felicitaciones, @FFA y @NZ_Football!
Serán ANFITRIONAS de la #FIFAWWC 2023. pic.twitter.com/PaL1PR6HyO
— FIFA Women's World Cup (@FIFAWWC) June 25, 2020
दरम्यान, फीफा च्या कार्यकारी कमिटीने सांगितलेल्या माहितीनुसार, येत्या चार वर्षात महिलांना फुटबॉल मध्ये पाठिंबा देण्यासाठी 1 बिलियन (805 मिलियन) ची तरतूद केली जाणार आहे. फ्रान्स मध्ये झालेल्या महिला विश्वचषकाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते यातूनच महिलांच्या फुटबॉल स्पर्धेला जागतिक स्तरावर ओळख प्राप्त झाली होती असेही फिफा तर्फे सांगण्यात आले.