
भारतीय पैलवान बजरंग पुनिया (Bajran Punia) आणि पॅरा अॅथलिस्ट दीपा मलिक (DeepaMalik) यांना खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रवींद्र जडेचा (Ravindra Jadeja) याला अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) गौरवण्यात येणार आहे. याबद्दल न्यायमूर्त मुकुंदमक शर्मा यांच्या समितीकडून घोषणा करण्यात आली आहे.
खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार हा गेल्या चार वर्षातील कामगिरीसाठी देण्यात येतो. येत्या 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य क्रीडा पुरस्काराचे वितरण होणार आहे. तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार देण्यात येतो. तसेच या पुरस्काराला क्रीडाक्षेत्रात मोठा मान आहे.(एशियाड सुवर्णपदक विजेता बजरंग पुनिया यांना मिळणार राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार)
गौरव केलेल्या खेळाडूला सात लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येते. आतापर्यंत सुशीलकुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांना खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते.