Zimbabwe National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd T20I Match 2024 Live Toss Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 3 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये दोन्ही संघांमधील सामना खेळला जात आहे. पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला. यासह पाकिस्तानने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत सिकंदर रझा झिम्बाब्वेचे नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान सलमान आघाच्या हातात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाला आपल्या वेगवान गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे, तर झिम्बाब्वेला आपल्या घरच्या मैदानावर विजयाची आशा आहे. दरम्यान, दुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Pakistan Beat Zimbabwe, 1st T20I Match 2024 Scorecard: पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 57 धावांनी केला पराभव, सुफियान मुकीम आणि अबरार अहमद यांनी केली घातक गोलंदाजी; येथे वाचा सामन्याचे स्कोरकार्ड)
पाहा पोस्ट -
ZIM vs PAK | 2nd T20I | Bulawayo
Zimbabwe won the toss and opted to bat first 🏏#ZIMvPAK pic.twitter.com/8T14nB9zQK
— CricWick (@CricWick) December 3, 2024
पाहा दोन्ही संघ
: ब्रायन बेनेट, तादिवनाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, क्लाइव्ह मदांडे, ताशिंगा मुसेकिवा, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू.
पाकिस्तान : ओमेर युसूफ, सईम अयुब, उस्मान खान (यष्टीरक्षक), सलमान आगा (कर्णधार), तय्यब ताहीर, इरफान खान, जहानदाद खान, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, हारिस रौफ, सुफियान मुकीम.