World Cup 2019: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव रिचर्डसन (Dave Richardson) यांनी सोमवारी आगामी विश्व कप (World Cup) दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या भारत ((India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) सामन्यासाठी कोणतेही संकट ओढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आयसीसी सोबत या दोन्ही संघांकडून खेळण्याचे वचनबद्ध करण्यात आले आहे. या दोन्ही संघातील क्रिकेट सामना 16 जून रोजी नियोजित वेळेवर खेळवला जाणार असल्याचे रिचर्डसन यांनी म्हटले आहे.
पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यामुळे पाकिस्तान सोबत कोणत्याही स्तरावर क्रिकेट संबंधित नाते न ठेवण्याचे सांगितले गेले होते. तसेच या दोन्ही संघातील सामन्यासाठी विविध प्रश्नसुद्धा उपस्थित केले जात होते.(हेही वाचा-ICC Cricket World Cup 2019 च्या स्पर्धेतून अंबाती रायुडू बाहेर; रायुडूच्या जागी 'या' खेळाडूला संघात स्थान देण्याची दिग्गजांची मागणी)
मात्र लोकांच्या मागणीमुळे सर्वोच्च न्यायालयाद्वारे गठीत प्रशासकांच्या समितीने आयसीसीला पत्र लिहिले. त्यामध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळला जाऊ नये आणि अन्य देशांमधून ही पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्यात यावा असे अपील केले असल्याचे पत्रात म्हटले होते.
परंतु रिचर्डसन यांनी असे म्हटले आहे की. विश्व कपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी करारावर हस्ताक्षरी केली असून त्यांना क्रिकेटचे सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे जरी कोणत्या संघाने सामना खेळण्यास नकार दिल्यास त्याचे सर्व गुण दुसऱ्या संघाला देण्यात येणार आहेत.