IND vs NZ 1st ODI 2022: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये संजु सॅमसनला मिळणार संधी? टीम इंडियाची कशी असु शकते प्लेइंग 11 जाणून घ्या
IND vs NZ (Photo Credit: Twitter/@Black Caps)

भारत विरुद्ध न्यूझीलंड: टी-20 मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, 25 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथील ईडन पार्क येथे होणार आहे. टी-20 मालिकेप्रमाणे या मालिकेतही अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचा कर्णधार आहे. या मालिकेसोबतच टीम इंडियाचा मिशन 2023 एकदिवसीय विश्वचषकही (ODI WC 2023) सुरू होणार आहे. या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत मालिकेच्या पहिल्या सामन्यात काही नवे चेहरे पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर उमराम मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) देखील या सामन्यातून भारतासाठी वनडे पदार्पण करू शकतात.

युवा खेळाडू पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात भारताचे कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्यालाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर दीपक चहर, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर हे संघात आहेत. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्याच वेळी, संजू सॅमसन आणि शुभमन गिलसारखे काही खेळाडू होते ज्यांचा संघात समावेश करण्यात आला होता, परंतु ते भारतासाठी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. या सामन्यात हे खेळाडू पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये पाहायला मिळतील. या सामन्यापूर्वी जाणून घेऊया, कर्णधार शिखर धवन त्याच्या प्लेइंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान देऊ शकतो. (हे देखील वाचा: IND vs NZ: झिम्बाब्वेविरुद्ध शेवटच्या क्षणी कर्णधारपदावरून हटल्यानंतर शिखर धवनने सांगितली मोठी गोष्ट)

पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग 11

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल