IND vs NZ: झिम्बाब्वेविरुद्ध शेवटच्या क्षणी कर्णधारपदावरून हटल्यानंतर शिखर धवनने सांगितली मोठी गोष्ट
Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

ऑकलंडमध्ये 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची वनडे (IND vs NZ) मालिका सुरु (ODI Series) होत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला होणार आहे. या दौऱ्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा भाग नसल्यामुळे संघाची कमान शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती आहे. यापूर्वी, धवनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाचे नेतृत्व केले होते आणि त्यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-20 विश्वचषकापूर्वी खेळला होता, तेव्हाही धवनच्या नेतृत्वाखाली होता. पण असा दौरा झाला जेव्हा शेवटच्या क्षणी त्याला कर्णधारपदावरून हटवून केएल राहुलकडे (KL Rahul) संघाची कमान सोपवण्यात आली. त्यावेळी असे का करण्यात आले याची बरीच चर्चा झाली होती, मात्र आता शिखर धवनने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल धवनचे स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत त्याला याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने सडेतोड उत्तर दिले. धवन म्हणाला की, "तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. हे माझ्यासाठी आव्हान आहे. आम्ही युवा खेळाडुसोबत अनेक मालिका जिंकल्या आहे." जर मी झिम्बाब्वे दौऱ्याबद्दल बोललो तर, केएल राहुल आमच्या संघाचा उपकर्णधार होता, तो परत आला तेव्हा मी लक्षात ठेवले की त्याला आशिया कपला जायचे आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN: बांगलादेश वनडेसाठी भारताचा संघ जाहीर, कुलदीप सेन आणि अष्टपैलू शाहबाज अहमदची टीममध्ये वर्णी)

मला कधीच वाईट वाटले नाही

आशिया चषकादरम्यान रोहितला दुखापत झाली असती तर केएलला नेतृत्व करण्यास सांगितले असते, त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने सराव करणे चांगले आहे असे मला वाटले. त्यामुळे मी दुखी नाही असे शिखरने सांगितले. मला वाटते की जेव्हाही हे घडते तेव्हा ते सर्वोत्कृष्ट असते. दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी माझ्यावर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली.