Eden Gardens in Kolkata (Photo Credit - Twitter)

विश्वचषक 2023 च्या 37व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सामना होणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens in Kolkata) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना दोन्ही संघ खेळणार आहेत. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि आफ्रिकेकडून उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. कोलकात्याच्या खेळपट्टीवर कोणाला सर्वाधिक मदत मिळेल, गोलंदाज किंवा फलंदाज (Eden Gardens Pitch Report) जाणून घेऊया. (हे देखील वाचा: Hardik Pandya Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का, Hardik Pandya विश्वचषक स्पर्धेतून बाहेर, Prasidh Krishna याला संधी; जाणून घ्या कारण)

कोणाला मिळणार मदत?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर फलंदाजांना सुरुवातीपासूनच भरपूर मदत मिळते. खेळपट्टीवर चांगली उसळी असल्याने चेंडू बॅटला चांगलाच आदळतो. मात्र, या मैदानावर फलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनाही मदत होते.

काय सांगतात आकडे?

ईडन गार्डन्सवर आतापर्यंत एकूण 37 एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी 21 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्याच वेळी, पाठलाग करणाऱ्या संघाने 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. म्हणजेच, आकडेवारीवर नजर टाकली तर नाणेफेक जिंकणे आणि धावफलकावर धावा टाकणे हा फायदेशीर व्यवहार ठरला आहे. पहिल्या डावातील सरासरी स्कोअर 240 आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी स्कोअर 201 आहे. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 404 आहे, जी भारताने श्रीलंकेविरुद्ध केली होती.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, प्रसिध्द कृष्णा, सूर्यकुमार यादव.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ्वान, कागिसो रबाडा. डुसेन, लिझाद विल्यम्स.