Hardik Pandya Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का, Hardik Pandya विश्वचषक स्पर्धेतून बाहेर, Prasidh Krishna याला संधी; जाणून घ्या कारण

विश्वचषक 2023 मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला विश्वचषक स्पर्धेतून (World Cup 2023) वगळण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी उदयोन्मुख असलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा (Prasidh Krishna) याचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने या निर्णयाची पुष्टी केली आहे. पांड्या याच्या घोट्याला दुखापत झाल्याने त्याला खेळता येणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. भारताचा अष्ठपैलू म्हणून ओळखला जाणारा पांड्या खेळणार नसल्याने त्याच्या चाहत्यांना आणि टीम इंडियाच्याही हितचिंतकांना धक्का बसला आहे.

पुणे येथे खेळल्या गेलेल्या बांगलादेश विरुदध भारत सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे उर्वरीत सामन्यांमध्ये त्याला सहभाग नोंदवणे कठीण झाले. त्याच्या तंदुरुस्तीच्या आभावामुळे प्रसिद कृष्णा याला संधी मिळाली आहे.

प्रसिध कृष्णा हा हा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आहे. स्पर्धेच्या इव्हेंट तांत्रिक समितीने त्याच्या समावेशास मान्यता दिली. ज्यामुळे तो खेळण्याच्या गटात त्याचा समावेश होणे सोपे झाले. प्रसिध कृष्णाने यापूर्वी आपली क्षमता दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय कामगिरीमध्ये डेव्हिड वॉर्नरची महत्त्वपूर्ण विकेट घेणे आणि विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ षटकांत केवळ 1/45 अशी त्याची अलिकडील सर्वात गाजलेली खेळी आहे.

एक्स पोस्ट

क्रिकेटप्रेमींसाठी कृष्णाची निवड लक्षणीय आहे, कारण त्याची स्पर्धा जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांसारख्या प्रस्थापित गोलंदाजांसोबत असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका सध्या विश्वचषक क्रमवारीत अव्वल दोन स्थानांवर आहेत आणि कोलकाता येथे होणार्‍या आगामी सामन्यातील विजेत्या संघाला स्पर्धेचा गट टप्पा पहिल्या स्थानावर पूर्ण करण्याचा फायदा होईल.