भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) घोट्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. मात्र, बीसीसीआयने (BCCI) यापूर्वीच ही माहिती दिली होती. 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पुनरागमन करण्याची शक्यता होती. पण दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. तो इंग्लंड आणि श्रीलंकेच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असेल. भारताला केवळ 5 गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागणार आहे. मात्र, न्यूझीलंडच्या हार्दिकशिवाय भारतीय संघाची गोलंदाजी उत्कृष्ट होती.
Hardik Pandya is set to be available from the South Africa game in the World Cup. [The Indian Express]
- He is likely to miss the England & Sri Lanka match. pic.twitter.com/hEo3iL1lD8
— Johns. (@CricCrazyJohns) October 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)