आयपीएल 2023 (IPL 2023) चा उत्साह कायम आहे. यंदाच्या मोसमात गोलंदाज आपली चमक दाखवत असतानाच फलंदाजही आपल्या फलंदाजीने चमकदार कामगिरी करत आहेत. सर्वाधिक प्रभावित करणारा खेळाडू म्हणजे राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल, (Yashasvi Jaiswal) ज्याने या मोसमात 56 सामन्यांत 75 चौकार मारले आहेत. या मोसमात सर्वाधिक चौकार मारणारा तो पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. (हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जैस्वालने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदांज)
56 सामन्यांनंतर सर्वाधिक चौकार मारणारे शीर्ष 10 फलंदाज
75- यशस्वी जैस्वाल (RR)
54- डेव्हॉन कॉनवे (CSK)
49- शिखर धवन (PBKS)
48- शुभमन गिल (GT)
46- डेव्हिड वॉर्नर (DC)
45- फाफ डु प्लेसिस (CSK)
42- जोश बटलर (RR)
41- सूर्यकुमार यादव (MI)
39- विराट कोहली (RCB)
38- इशान किशन (MI)
पहिल्या क्रमांकावर असलेल्या जसवालने 557 केल्या धावा
राजस्थान रॉयल्सची यशस्वी जैस्वाल यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 56 व्या सामन्यात केकेआर विरुद्ध 98 धावांची तुफानी इनिंग खेळली होती. या खेळीत त्याने 13 चौकार मारले. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही हा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. जैस्वालने 12 सामन्यात 575 धावा केल्या आहेत.