रोहित शर्मा ने केला खुलासा; कधी आणि कसं होऊ शकतं IPL, केविन पीटरसनसोबत लाईव्ह चॅटमध्ये उघडकीस केला करिअरमधील सर्वात खराब क्षण
रोहित शर्मा आणि केविन पीटरसन (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा तुफानी सलामी फलंदाज आणि आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आयपीएल (IPL) 2020 कधी आणि कोठे आयोजित केला जाऊ शकतो याचा खुलासा केला आहे. रोहितने म्हटले आहे की कोरोना व्हायरसचा सामना केल्यानंतर बीसीसीआय (BCCI) परिस्थितीत बरीच सुधारणा झाल्यावर जगातील सर्वात महागड्या टी-20 क्रिकेट लीगचे आयोजन करू शकेल. इंग्लंड संघाका माजी फलंदाज आणि भाष्यकार केविन पीटरसनसोबत ( Kevin Pietersen) थेट इन्स्टाग्राम व्हिडिओ कॉल करत असताना हिटमॅन रोहितने इंडियन प्रीमिअर लीगच्या आयोजनावर प्रतिक्रिया दिली. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन दिग्गज खेळाडूंमध्ये एक छोटाशी सोशल मीडिया मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान पीटरसनने जेव्हा मुंबई संघाचा कर्णधार रोहितला विचारले की यावेळी आयपीएल होईल की नाही? यास रोहितने उत्तरं दिलं की सध्या सर्व काही परिस्थितीवर अवलंबून आहे. (IPL 2020 बाबत अनिश्चितता कायम, BCCI ने फ्रँचायझी मालकांसह कॉन्फरन्स कॉल केलं स्थगित)

या शिवाय रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात खराब क्षणाबद्दलही खुलासा केला. रोहित म्हणाला 2011 वर्ल्ड कपसाठी त्याची निवड न होणे हा त्याच्या करिअरमधील सर्वात खराब क्षण होता. 2011 विश्वचषकचे आयोजन भारतात करण्यात आले असून त्याचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते, जे रोहितचे होम ग्राउंड आहे. पण त्याच्या स्वतःच्या चुकांमुळे त्याची निवड न झाल्याचेही रोहितने मान्य केले.

दुसरीकडे, मागील वर्षी इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत 5 शतकं करणारा रोहित पहिला फलंदाज बनला होता. शिवाय, 2019 मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅट, टेस्ट क्रिकेटमध्ये, सलामी फलंदाज म्हणूनही सुरुवात केली. यावर्षीच्या सुरुवातील न्यूझीलंड दौऱ्यावर रोहितला टी-20 सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली ज्यामुळे त्याला वनडे आणि टेस्ट मालिकेमधून माघार घ्यावी लागली.