West Indies vs New Zealand Live Streaming on DD Sports and Prasar Bharti for Free: रेडिओ वर लूटा WI vs NZ मॅन्चेस्टर सामन्याचा LIVE आनंद

WI vs NZ, ICC Cricket World Cup 2019: आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये 29 वा सामना वेस्ट इंडिज (West Indies) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानात खेळाला जाईल. दोन संघातील हा सामना बघण्यासाठी चाहते मॅन्चेस्टर (Manchester) येथे पोहचले आते. आणि जे इथे पोहचू शकले नाही त्यांना घरी बसल्या-बसल्या हा सामना DD Sports वर लाईव्ह बघता येईल. शिवाय बहुचर्चित रेडियो चॅनेल प्रसार भारती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) ही वेस्ट इंडिज-न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह भाष्य करणार आहे. प्रेक्षक प्रसार भारती च्या FM 106.40 मेगाहर्ट्ज वर सामन्याची लाईव्ह भाष्य ऐकू शकतात.

दरम्यान, न्यूझीलंड संघाने आपले 5 पैकी 4 सामने जिंकून पहिल्या चार मध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे तिथे वेस्ट इंडिज संघ विश्वकप मध्ये संघर्ष करताना दिसतोय. विंडीज संघाने 5 सामने खेळून 1 एकात विजय मिळवला आहे तर 3 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. विंडीज संघाचे 2 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते.

विंडीज संघाला पराभूत करून न्यूझीलंडचा संघ ICC गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर पोहचू शकतो. दुसरीकडे, विश्वकप मध्ये आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विंडीज संघाला हा सामना संपूर्ण ताकदीने खेळावा लागणार आहे.