भारतीय संघाबरोबर दोन हात करण्यासाठी इंग्लंडचा संघ आज भारतामध्ये दाखल झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर इंग्लंडचा संघ आता चेन्नई विमानतळावर पोहचला होता. त्यावेळी इंग्लंडच्या संघासह सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर संघ हॉटेलच्या दिशेने रवाना झाला. दरम्यान, गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी ट्विट करून इंग्लंडच्या संघाचे स्वागत केले आहे. तसेच ही मालिका चांगली असेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात इंग्लंडचा संघ हॉटेलमध्ये चेकईन करताना दिसत आहे.
दरम्यान, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर यांसह काही खेळाडू यापूर्वीच भारतात पोहचले आहेत. आता उर्वरित संघदेखील कर्णधार जो रुटच्या नेतृत्वात भारतात दाखल झाला आहे. इंग्लंडचा संघ तामिळनाडूच्या चेन्नई विमानतळावर पोहताच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहील. त्यानंतर सरावासाठी मैदानात उतरणार आहे. हे देखील वाचा- IND vs ENG Series 2021: टीम इंडियाशी दोन-हात करण्यासाठी जो रूटचा इंग्लंड संघ चेन्नईत दाखल, एअरपोर्टवर झाली COVID टेस्ट, पहा Photos
सुंदर पिचाई यांचे ट्विट-
Welcome to my hometown @englandcricket wish was there for the game, should be a great series https://t.co/BNRDOQnnyO
— Sundar Pichai (@sundarpichai) January 27, 2021
श्रीलंका दौरा करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने कसोटी मालिकेत श्रीलंकेच्या संघाला 2-0 पराभूत केले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट सातत्याने चांगला खेळ दाखवत आहे. भारतीय संघासाठी हे चिंतेचे कारण आहे. तथापि, भारतीय संघानेदेखील ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-1 ने धूळ चारली आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.