IND vs AFG, ICC Cricket World Cup 2019: आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये आज एजबस्टन (Edgbaston) येथे भारत (India) विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanistan) सामना खेळाला जाईल. हा सामना पाहण्यासाठी हजारो चाहते एजबस्टन येथे पोहोचले आहेत. तर या सामन्यासाठी इंग्लंडला पोहचू न शकलेले दूरदर्शनवरील डीडी स्पोर्ट्सवर या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. दरम्यान, देशभरातील बहु-प्रवाहित रेडिओ चॅनेल प्रसार भारती स्पोर्ट्स भारत-अफगाणिस्तान सामन्याची लाईव्ह भाष्य सादर करणार आहे. आपण प्रसार भारतीच्या एफएम 106.40 मेगाहर्टझच्या भेट देऊन सामन्याचे LIVE भाष्य ऐकू शकता. (IND vs AFG, ICC World Cup 2019: सुपरफास्ट विराट कोहली ला विश्वविक्रम करण्याची संधी; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा ला ही टाकणार मागे)
भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, यातील तीन सामन्यात विजय तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. ICC गुणतालिकेत भारत 7 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचे पुढील सामने हे इंग्लंड, बांगलादेश, वेस्ट इंडिज, आणि श्रीलंका यांच्याविरोधात होणार आहे. भारतानं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघाना नमवलं आहे तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावासामुळं रद्द झाला होता. भारतीय संघाने आपले बाकीचे सामने जिंकल्यास थेट सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो.
भारताने विश्वकप मधील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळाला. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अफ्रिका संघाचा पराभव करत आपला पहिला विजय साजरा केला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध संघाने शानदार प्रदर्शन केले आणि दुसरा विजय मिळवला. मात्र न्यूझीलंड विरुद्ध शम रद्द झाल्याने मात्र सगळ्यांची निराशा झाली.