IND vs AFG, ICC World Cup 2019: सुपरफास्ट विराट कोहली ला विश्वविक्रम करण्याची संधी; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा ला ही टाकणार मागे

अफगानिस्तानविरुद्ध सामन्यात कोहलीला तेंडुलकरला आणखी एक रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी आहे. विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 104 धावांची गरज आहे.

IND vs AFG, ICC World Cup 2019: सुपरफास्ट विराट कोहली ला विश्वविक्रम करण्याची संधी; सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा ला ही टाकणार मागे
(Image: PTI/File)

असे दिसते की भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा प्रत्येक रेकॉर्ड तोडण्याचा जणू काही निर्धारच केला आहे. प्रत्येक वेळी फलंदाजी करता येताना कोहली छोटा असो वा मोठा, सचिनचा कोणता तरी विक्रम मोडतोच. यंदाचं ICC विश्वकप 2019 ही काही वेगळे नाही. पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्यात कोहलीने वनडे कारकिर्दीत सर्वात वेगवान 11 हजार धावा पूर्ण करत तेंडुलकरला मागे टाकले. आणि आता अफगानिस्तानविरुद्ध सामन्यात कोहलीला तेंडुलकरला आणखी एक रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी आहे. शिवाय तो एक जागतिक विक्रम ही आपल्या नवे करू शकतो. (ICC World Cup 2019: भारतीय संघासाठी 'अच्छे दिन'; अष्टपैलू विजय शंकर विश्वकप खेळायला फिट)

कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 104 धावांची गरज आहे. त्यामुळे जर कोहली अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध 104 धावा करण्यात यशस्वी झाला तर तो 20,000 धावा करणारा 12 वा आणि तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. भारतासाठी सचिन तेंडुलकर (34,357 धावा) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) (24,208 धावा) यांनी वनडे  क्रिकेटमध्ये 20 हजार किंवास जास्त धावा केल्या आहेत. शिवाय, हा रेकॉर्ड गाठणारा कोहली सर्वात वेगवान फलंदाज होईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20,000 धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड फक्त सचिन तेंडुलकर चा नाही. सचिन वेस्ट इंडिज (West Indies) च्या ब्रायन लारा (Brian Lara) बरोबर हा रेकॉर्ड शेअर करतो. सचिन आणि लारा ने 453 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळात 20 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तिथेच कोहलीने आजवर 415 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2019 11:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).