ICC World Cup 2019: भारतीय संघासाठी 'अच्छे दिन'; अष्टपैलू विजय शंकर विश्वकप खेळायला फिट
(Photo Credits: IANS)

भारतीय संघाने विश्वकपमध्ये आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. मात्र दुसरीकडे खेळाडूंच्या दुखापतींची संख्या वाढल्यामुळं कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ची चिंता वाढली आहे. पहिले शिखर धवन (Shikhar Dhawan) ला दुखापतीमुळे विश्वकपमधून बाहेर पडावे लागले, त्यातच भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) ही दुखापतींमुळं काही सामने खेळणार नाही आहे. भारताच्या या दुखापतीच्या यादीत अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) च्या नावाची भर पडली आहे. मात्र, विजय शंकर आता फिट आहे आणि शनिवारी अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध तो खेळू शकतो. (ICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया)

अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी एका पत्रकार परिषदेत जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) म्हणाला, "नेटमध्ये सराव करताना कोणताही फलंदाज जखमी व्हावा अशी इच्छा नसते. विजय शंकर जखमी झाला, पण आता तो ठीक आहे".

विजयला सरावादरम्यान नेट्स मध्ये फलंदाजी करताना बुमराहचा यॉर्कर पायाला लागल्याने दुखापत झाली होती. विजयने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सामन्यात विश्वकपमध्ये पदार्पण केले. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजीत कमाल करत इमाम उल हक आणि सर्फराज अहमदची विकेट घेतली होती.