ICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया
(Photo Credit: IANS)

भारतीय संघात दुखापतीच सत्र सुरूच आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) च्या पाठोपाठ अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar) ला ही नेट्स मध्ये सराव करताना दुखापत झाल्याचं काळत आहे. प्राप्त माहितीनुसार, टीम इंडियाच्या सरावा दरम्यान विजयच्या पायाला जसपीत बुमराह (Jasprit Bumrah) याने टाकलेल्या यॉर्करमुळे अंगठ्याला जखम झाली आहे. दरम्यान, विजय याच्या दुखापतीबद्दल बीसीसीआय (BCCI) ने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (ICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त)

विजयला दुखापत झाल्याची बातमी कळताच नेटिझन्स ने आपले काम सुरु केले ज्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. Netizens ने ट्विटरवर 3D जादूला विजयच्या दुखापतीचे कारण सांगितले आहे.

कोणीचीतरी 3D नजर लागली आहे वाटतं!

आता विजय शंकर जखमी, हा पंतचा काळा जादू आहे का?

विजय शंकर ने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सामन्यात विश्वकपमध्ये पदार्पण केलं. विश्वकपमधील आपल्या पहिल्याच चेंडूनत शंकरने इमाम उल हक (Imam ul-Haq) याचा बळी घेतला होता. विजयला फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू म्हणून निवडले आहे. दरम्यान, टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे कारण भुवनेश्वर कुमार हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे पुढील काही दिवस शकणार नाही. भुवनेश्वरचा पर्याय म्हणून मोहम्मद शमी (Mohammed Shami) ला संघात स्थान मिळू शकते.