ICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त
Vijay Shankar (Photo Credits: Getty Images)

ICC World Cup 2019: आयसीसी वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक जोरदार झटका बसला आहे. विजय शंकर (Vijay Shankar) याच्या रुपात आणखी एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियातील एक अष्टपैलू खेळाडू अशी विजय शंकर याची ओळख आहे. बुधवारी सराव सामन्यादरम्यान त्याच्या पायाला जबर दुखापत झाली.

प्राप्त माहितीनुसार, टीम इंडिया सराव  बुधवारी सराव करत असताना विजय शंकर फलंदाजी करत होता. दरम्यान, त्याच्या पायाला दुखापत झाली होती. जसपीत बुमराह याने टाकलेल्या यॉर्करमुळे विजय शंकर याच्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ही जखम फारशी गंभीर नव्हती. विजय शंकर याला वेदना होत होत्या. मात्र, सायंकाळपर्यंत त्या वेदना कमी झाल्या होत्या.

टीम इंडियाने विजय शंकर याला फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर खेळणारा खेळाडू म्हणून निवडले आहे. आपल्या दमदार फलंदाजीप्रमाणे विजय शंकर गोलंदाजीही तितकीच दमदार करतो. दरम्यान, विजय शंकर याच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

विजय शंकर याने पाकिस्तान विरोधात दोन सामने खेळले होते. भुवनेश्वर कुमार याला दुखापत झाली होती आणि त्याचे अर्धवट राहिलेले षटक पूर्ण करण्यासाठी विजय शंकर आला होता. आपल्या पहिल्याच चेंडूनत शंकरने इमाम उल हक याचा बळी घेतला होता. शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नव्हता. दरम्यान, विजय शंकर याला प्लेइंग इलेवन मध्ये सहभागी कुन घेण्यात आले होते. (हेही वाचा, IND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर)

दरम्यान, टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे कारण भुवनेश्वर कुमार हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे पुढील काही दिवस शकणार नाही. इंग्लंड विरोधात 30 जून रोजी होणाऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार याच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजाचे पारडे काहीसे हलके होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भुवनेश्वर याला संघाबाहेर राहावे लागले तर, त्याच्या जागी मंगंमद शमी याला संधी मिळू शकते. टीम इंडियाला पहिला झटका शिखर धवन याच्या रुपात बसला आहे. शिखर धवन याला संपूर्ण वर्ल्ड कप संघाबाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे शिखरच्या जागेवर रिषभ पंत याला संघात सहभागी करण्यात आले आहे.