Team India Orange Jersey (Photo Credits: Twitter)

Team India Orange Jersey: विराट कोहली (Virat Kohli0 च्या भारतीय संघाने विश्वकपमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. भारताने आपले 4 पैकी 3 सामने जिंकून सेमीफायनलसाठी आपली दावेदारी पक्की केली आहे. भारताने आपले पहिल्या 3 सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. यापुठे संघाचा मोठा सामना यजमान इंग्लंड (England) शी 30 जूनला एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जाईल. (Style मै रहने का! CWC साठी भारतीय संघाने बदलला आपला हेअरस्टाईल, View Photos)

इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी भारतीय संघात मोठा बदल कारणात येणार आहे आणि तो बदल म्हणजे या सामन्यासाठी संपूर्ण भारतीय संघ एका वेगळ्या रंगाच्या परिधानात दिसणार आहे. सुत्रांप्रमाणे भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध नारंगी (Orange) रंगाच्या जर्सीत दिसेल. आयसीसी (ICC) ने एका सामन्यासाठी समान रंगाची जर्सी वापरू शकत नाही असा नियम बनवला आहे. भारत (India) आणि इंग्लंड दोघे निळ्या रंगाची जर्सी परिधान करतात. इंग्लंड हा यजमान देश असल्याकारणामुळे त्यांना आपले तेच किट ठेवण्याचा हक्क आहे आणि म्हणून भारताला नवीन रंगाची जर्सी घालावी लागणार आहे. सूत्रांप्रमाणे, इंग्लंडविरुद्ध सामन्यात अशी अपेक्षा केली जाते आहे की भारतीय जर्सीचा वर्चस्व रंग नारंगी असेल, जो कॉलरवर असतो आणि कॉलरवर निळा रंग असेल. Team India च्या नवीन जर्सी बाबात नेटिझन्स मध्येही उत्सुकता लागली आहे आणि संघावर ही भगव्या रंगाची छाप असल्याच बोलताहेत.

भारतीय संघी ही झाला भगवा

भारतीय मीडिया आणि इस्लामवाद्यांचा एक भाग भारतीय संघाला भगव्या रंगात बघून पागल होईल

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या विश्वकप 2019 च्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या शर्टचा रंग हिरव्यापासून पिवळा ठेवला होता. दोन्ही संघाच्या जर्सीचा मुख्य रंग हिरवा आहे. बांग्लादेशाने देखील प्रभावी लाल रंगाचा एक किट विश्वकपमध्ये परीधान केला होता.