Style मै रहने का! CWC साठी भारतीय संघाने बदलला आपला हेअरस्टाईल, (View Photos)
(Photo Credits: Twitter)

यंदाच्या विश्वकपमध्ये भारतीय संघाने दमदार सुरुवात केले आहे. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तान (Afghanistan) संघाशी 22 जूनला होईल. भारताने आपले 4 पैकी 3 सामने जिंकले असून न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारतीय संघ आपल्या खेळासह आपली हटके हेअरस्टाईलसाठी ही चर्चेत राहिला आहे. बऱ्याच खेळाडूंनी विश्वकपसाठी आपल्या केसांचा लुक बदलला आहे. (ICC World Cup 2019: रिषभ पंत की विजय शंकर? अफ़ग़ानिस्तान विरुद्ध Team India च्या प्लेइंग XI मध्ये कोणाला मिळणार संधी, जाणून घ्या)

सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकिम (Alim Hakim) याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या स्टार खेळाडूंसोबतचे काही फोटो शेअर केले. हकीम ने हार्दिक पंड्या (Hardik Pandya), एम, एस धोनी (MS Dhoni) सारख्या खेळाडूंच्या केसांना विश्वकपसाठी खास नवीन लुक दिलाय. बीसीसीआय (BCCI) ने आपल्या ट्विटरवर या खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंह धोनी यांचा नवा लूक पाहायला मिळत आहे.

या खेळाडूंचा हा नवीन लुक बघून विश्वकपमध्ये ही 'स्टाईल मै रहने का' असं म्हणायला हरकत नाही.