ICC World Cup 2019: रिषभ पंत की विजय शंकर? अफ़ग़ानिस्तान विरुद्ध Team India च्या प्लेइंग XI मध्ये कोणाला मिळणार संधी, जाणून घ्या
(Photo Credit: Twitter)

विश्वकप मधील आपले तिन्ही सामने जिंकून भारतीय संघाने सेमीफायनल साठी आपली दावेदारी अजून मजबूत केली आहे. पकिस्तान (Pakistan) ला विश्वकपमध्ये सातव्यांदा पराभूत केल्यावर भारताचा सामना आता अफ़ग़ानिस्तान (Afghanistan) शी 22 जूनला रोस बॉल (Rose Bowl) मैदानात खेळाला जाईल. या सामन्याआधीच संघ व्यवस्थापन याच्या समोर एक मोठा प्रश्न उभा आहे आणि तो म्हणजे, चौथ्या स्थानावर रिषभ पंत (Rishabh Pant) ला खेळवावे की विजय शंकर (Vijay Shankar) ला. (ICC World Cup 2019: रिषभ पंत आहे शिखर धवन चा योग्य Replacement, ही आहेत 5 करणं)

रिषभ पंतचा जरी संघात समावेश केला गेला असला तरी विजय शंकर आधी पासूनच संघाचा भाग होता. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात के. एल राहुल (KL Rahul) सलामीला आल्यामुळे विजयला चौथ्या स्थानावर खेळण्यास संघात घेतेले होते. विजय जरी आपल्या फलंदाजी ने निराश केले असले तरी त्यांच्या गोलंदाजी ने मात्र प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. विश्वकप (World Cup) मध्ये पदार्पण करण्याऱ्या शंकरने आपली उपस्थिती जाणवून देत पाकिस्तानचे दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या (सलामीवीर इमाम उल-हक (Iman ul-Haq) आणि कर्णधार सर्फराज अहमद (Sarfraz Ahmed). जरी विजयला चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी नामांकन दिले असले तरी तो आता सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे, जर हार्दिक पंड्या चौथ्या करमणुक फलंदाजी करायला आला.

दुरीकडे, पंतचा परदेशी खेळपट्टीवरचा रेकॉर्ड चांगला आहे. पंतने आजवर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) विरुद्ध कसोटी सामन्यात 2 प्रत्येकी 1 शतक ठोकले आहे. पंतने यंदाच्या आयपीएल (IPL) मध्ये चांगले प्रदर्शन केले होते. दिल्ली (Delhi) साठी खेळताना पंतने काही सामने स्वबळावर जिंकूनही दिले होते. रिषभ नंबर चारवर खेळण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पंत आक्रमक खेळी खेळणारा फलंदाज आहे. पण, विजयच्या समावेशाने संघाला तीन विभागात फायदा होतो, (फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण), तिथे पंतच्या समावेशाने भारताला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात फायदा मिळतो. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात या दोन पैकी कोणाला संधी मिळते हे बघणे रोमांचक ठरेल.

दुखापतग्रस्त शिखर धवन (Shikhar Dhawan) ऐवजी पंतला संघात स्थान दिले आहेत. धवनला पर्याय म्हणून रिषभ पंत आधीच इंग्लंडला रवाना झाला होता. आता धवनची दुखापत लवकर बरी होणार नसल्या कारणाने भारताने पंतला संघात समाविष्ट केले आहे.