Ranji Trophy 2019-20: भारतीय फलंदाज वसीम जाफर ने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीमध्ये 12000 धावा करणारा बनला पहिला खेळाडू
वसीम जाफर (Photo Credits: Getty Images)

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळलेल्या उजव्या हाताचा फलंदाज वसीम जाफर (Wasim Jaffer) ने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) इतिहास रचला आहे. विदर्भा टीमच्या या दिग्गज फलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा 12 हजार धावा करण्याचा विक्रम नोंदविला आहे. भारतात खेळल्या जाणार्‍या प्रथम श्रेणी क्रिकेट, रणजी ट्रॉफीमध्ये जाफरने जितक्या धावा फटकावल्या आहेत तितक्या कोणत्याही फलंदाजाने आजवर केल्या नाहीत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन (Vidarbh Cricket Assosiation) स्टेडियममध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीचिआ एलिट ग्रुप अ आणि बी सामन्यात केरळाविरुद्ध (Kerala) फलंदाजी करताना त्याने ही कामगिरी केली. यजमान विदर्भा संघाला पहिला धक्का 4 धावांवर बसला, ज्यानंतर जाफर फलंदाजीला आला. (Ranji Trophy: उत्तर प्रदेशविरुद्ध पहिले तिहेरी शतक करत मुंबईचा सरफराज खान 'या' एलिट यादीमध्ये झाला सामिल)

जाफर मुंबई आणि विदर्भाकडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. 2019-20 हंगामाच्या सुरूवातीआधी, जाफरने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 11,775 धावा केल्या होत्या. आणि काही डावात त्याने 200 हून अधिक धावा करून 12000 धावांचा टप्पा गाठला. या मोसमात यापूर्वी जाफरने आपला 150 वा रणजी ट्रॉफी सामना खेळून इतिहास रचला होता. जाफर आता या स्पर्धेत सर्वाधिक मॅच खेळणारा फलंदाज ठरला आहे.

1996-97 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा क्रिकेटपटू भारतीय घरगुती क्रिकेटमधील एक प्रख्यात म्हणून उदयास आला. देशांतर्गत स्पर्धेत त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते. जाफरने भारताकडून 31 कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2008 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अखेरचा सामना खेळला होता.