Ranji Trophy: उत्तर प्रदेशविरुद्ध पहिले तिहेरी शतक करत मुंबईचा सरफराज खान 'या' एलिट यादीमध्ये झाला सामिल
सरफराज खान (Photo Credits: Twitter)

मुंबईच्या आणखी एका युवा प्रतिभावान फलंदाजाने रणजी करंडक स्पर्धेत दुहेरी शतक झळकावले आहे. उत्तर प्रदेशविरुद्ध (Uttar Pradesh) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याने द्विशतक ठोकले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे सरफराजचे पहिले दुहेरी शतक आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर सरफराजने उत्तर प्रदेशविरूद्ध अप्रतिम डाव खेळला असून आपल्या संघाला पराभवापासून वाचविले. बुधवारी सरफराजने तिहेरी शतक झळकावत उत्तर प्रदेशविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई संघाला जोरदार पुनरागमन केले. रणजी ट्रॉफी स्पर्धेत तिहेरी शतकी खेळी करणारा सरफराज मुंबईचा सातवा फलंदाज ठरला. यापूर्वी सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, वसीम जाफर, रोहित शर्मा, विजय मर्चंट आणि अजित वाडेकर यांनी हा पराक्रम केला आहे. यासह सरफराजने 10 वर्षाचा दुष्काळ संपवला. सरफराजच्यापूर्वी रोहित शर्माने 2009 मध्ये मुंबईकडून तिहेरी शतक झळकावले होते. (खेळाडूंच्या दुखापतीमुळे BCCI अस्वस्थ, रिद्धिमान साहा याला रणजी ट्रॉफी सामना खेळण्यास केली मनाई)

उत्तर प्रदेशने उपेंद्र यादवच्या नाबाद दुहेरी शतकाच्या मदतीने पहिला डाव 625/8 वर घोषित केला. पण सरफराजच्या 301 चेंडूत 391 धावांची खेळी दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले. दरम्यान, अनुभवी फलंदाज वसीम जाफर हा दोन तिहेरी शतकं ठोकणारा मुंबईचा एकमेव फलंदाज आहे. यापूर्वी, पृथ्वी शॉने या मोसमात बडोद्याविरुद्ध खेळताना दुहेरी शतकही झळकावले होते. पृथ्वीने फक्त 175 चेंडूत आपले दुहेरी शतक झळकावले होते. मुंबईचा संघ उत्तर प्रदेशच्या 625 धावांच्या विशाल स्कोअरसमोर दुबळा दिसत होता. त्यांनी 128 धावांवर चार गडी गमावले होते. मात्र, सरफराज आणि सिद्धेश लाड यांनी मुंबईची सूत्रे हाती घेत 210 धावांची भागीदारी केली. मुंबईने उत्तर प्रदेशवर 63 धावांनी आघाडी मिळवून सामना ड्रॉ केला. मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने 97 धावांची शानदार खेळी साकारली तर अष्टपैलू शम्स मुलानीने 65 धावा फटकावून फोडल्या.

उल्लेखनीय म्हणजे की सरफराजने आपल्या जुन्या रणजी संघ उत्तर प्रदेशविरुद्ध तिहेरी शतक झळकावले. गेल्या हंगाम सुरू होण्यापूर्वी सरफराजने मुंबई सोडून उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते.