विराट कोहली याच्या चाहत्याने आपल्या अनोख्या हेअर स्टाईलने जिंकले सोशल मीडियावर यूजर्सचे मन, Photo पाहिल्यावर तुम्हीही व्हाल प्रभावित
चिराग खिलारे, विराट कोहली (Photo Credit: Twitter/Getty)

भारतीय (India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे चाहते संपूर्ण विश्वात पसरलेले आहे. कोहली सध्या ऑस्ट्रेलिया (Australiia) विरुद्ध 3 सामन्यांच्या घरगुती वनडे मालिकेत व्यस्त आहे. सर्वात फॉलो केल्या जाणाऱ्या क्रीडा व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या कोहलीचे जगभरात असंख्य चाहते आहेत आणि मैदानात किंवा मैदानाबाहेरुन भारतीय कर्णधार त्यांचे स्वागत करतो आणि आभार मानतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी वनडे पहिल्या सामन्यात कोहलीचाय एका चाहत्याने त्याच्या डोक्यावर विराटचा चेहरा वाटणार अशी अनोखी हेअर स्टाईल केली आहे. या चाहत्याचे नाव चिराग खिलारे (Chirag Khilare) आहे. कोहलीच्या या फॅनची हेअर स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खिलारेने ट्विटरवर आपल्या अनोख्या हेअर स्टाईलचा फोटो पोस्ट केले. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना त्याने कोप्शन दिले, "कोहली मनापासून डोक्याकडे.' (विराट कोहली याला ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड जाहीर झाल्यावर 'या' कारणामुळे झाला आश्चर्य, पाहा Video)

'बर्याच वर्षांपासून मी भारतात खेळल्या जाणार्‍या प्रत्येक सामन्यात विराटचा फॉलो करीत आहे आणि कोहली अंडर-19 संघाचा कर्णधार झाल्यापासून मी त्याचा फॅन आहे,' खिलारेने एएनआयला सांगितले. खिल्लारे म्हणला की हेअर टॅटू काढण्यास त्याला सुमारे सहा ते आठ तास लागतात आणि आपण कर्णधार कोहलीची झलक बर्‍याचदा पाहिली आहे, परंतु अद्याप त्यांना भेटण्याची संधी मिळू शकली नाही. "माझे स्वप्न कोहलीला भेटण्याचे आहे आणि जेव्हा मी त्याला भेटेन तेव्हा मी पहिले त्याच्या पायाला स्पर्श करीन आणि त्याला मिठी मारून तो क्षण फोटोद्वारे टिपून घेईन," असे तो पुढे म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात भारतासाठी अत्यंत निराशाजनक होती. आपण स्वतः इतक्या वाईतपणे पराभूत होऊ याची भारतीय संघानेही अपेक्षा केली नसावी. ऑस्ट्रेलियाने यजमान संघाला 10 ने पराभूत करत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि भारतीय संघ 255 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांच्या नाबाद शतकी खेळीच्या मदतीने हा सामना जिंकला. या मालिकेचा दुसरा सामना 17 जानेवारीला राजकोटच्या स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.