विराट कोहली (Image: PTI/File)

भारताचा (India) वनडे आणि टी-20 संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची बुधवारी आयसीसी (ICC) 2019 ची वनडे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. 2019 मध्ये रोहितने शानदार प्रदर्शन केले, तर इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याला आयसीसीचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' (Spirit Of Cricket) पुरस्कार देण्यात आला. याशिवाय विराटची आयसीसी टेस्ट आणि वनडे वर्षाचा संघाचा कर्णधार म्हणूनही निवड करण्यात अली. भारतीय कर्णधार कोहलीने गेल्या काही वर्षांपासून चुकीच्या गोष्टींमुळे चर्चेत राहिल्या कारणाने त्याने यंदा आयसीसीचा स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार जिंकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. विश्वचषक दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान बॉल टेंपरिंग प्रकरणात एक वर्षाच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला सामन्यादरम्यान चाहत्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली, या दरम्यान विराटने चाहत्यांना रोखले आणि स्मिथला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. यासाठी विराटला हा खास पुरस्कार मिळाला आहे. (Truly Deserving! रोहित शर्मा याचे ICC वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकल्याबद्दल Netizens ने केले कौतुक)

बीसीआयने आयसीसी पुरस्कार जाहीर झाल्यावर रोहित आणि विराटचा प्रतिक्रिया देतानाचा व्हिडिओ शेअर केला. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली म्हणाला, “बर्‍याच वर्षांपासून चुकीच्या गोष्टींसाठी स्कॅनरखाली राहिल्यानंतर हा पुरस्कार जिंकल्याबद्दल मला आश्चर्य वाटले आहे.” स्मिथच्या पाठीशी उभे राहण्याचे कारण स्पष्ट करताना कोहली पुढे म्हणाला, “तो क्षण एखाद्या व्यक्तीची परिस्थिती पूर्णपणे समजून घेत होता. अशा परिस्थितीतून बाहेर पडणार्‍या एखाद्याचा फायदा घेण्याची गरज नाही असं मला मला वाटते.” चाहत्यांकडून होणार्‍या काही वैमनस्यासंबंधी प्रतिक्रिया म्हणून गर्दीला मधलं बोट दाखवल्याबद्दल कोहलीला एकदा त्याला सामन्यात 50 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.

जवळपास तीन वर्षांपूर्वी विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथवर डीआरएस वापरात फसवणूक केल्याचा अक्षरशः आरोप करत मोठा वाद निर्माण केला होता. त्या वेळी सूचनांसाठी स्मिथने ड्रेसिंग रूमकडे लक्ष दिले होते आणि “ब्रेन फीड” बद्दल माफी मागितली होती. या घटनेमुळे भारतातील एका कसोटी मालिकेदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये तणाव वाढला होता.