आयसीसीने (ICC) भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याची वनडे क्रिकेटर ऑफ द इयर (ODI Player Of The Year) पुरस्कारासाठी निवड केली आहे. आयसीसीने बुधवारी 2019 च्या पुरस्कारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) याला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या (India) सामन्यामध्ये स्टीव्ह स्मिथ याला चिडवत असलेल्या चाहत्यांना विराटने रोखले होते. वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून भारतीय संघाच्या उपकर्णधाराने पहिल्या स्थानावर राहून वर्ष2019 संपवले. त्याने 57.31 च्या सरासरीने 1490 धावा केल्या. मागील वर्षीच्या विश्वचषक (World Cup) स्पर्धेत त्याने सर्वाधिक सलग 5 शतकं केली एका वर्षात रोहितने सात वनडे शतकं केली, जे एका कॅलेंडर वर्षातील संयुक्त दुसरे सर्वाधिक आहे. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान वगळता, रोहितने 2019 मध्ये खेळलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एक शतक केले आहे. रोहितने मागील वर्षी केलेल्या 1490 धावांमधील 648 धावा त्याने 2019 विश्वचषक स्पर्धेत केल्या, जे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक होत्या. (ICC Awards: रोहित शर्मा 2019 चा वनडे क्रिकेटर, विराट कोहली याला मिळाला 'हा' पुरस्कार, पाहा पूर्ण लिस्ट)
आयसीसीच्या वर्षाच्या एकदिवसीय क्रिकेटपटूच्या विजयाची ही सहावी वेळ आहे. एमएस धोनी हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय होता. 2008 आणि 2009 मध्ये सलग दोनदा आयसीसीचा वर्षातील वनडे खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच क्रिकेटपटू होता. 2012 मध्ये विराट कोहलीने हाच पुरस्कार जिंकला होता, आणि नंतर त्याने 2017 आणि 2018 मध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती केली. मात्र, 2019 मध्ये रोहितने कोहलीसह सर्वांना मागे टाकले आणि त्यावर्षीचा आयसीसीचा वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला. रोहितच्या या पुरस्कार विजयाबद्दल नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले.
2019 हिटमन वर्ष
2019 is #Hitman Year 🔥 Congratulations @ImRo45 for winning ICC ODI Cricketer of the Year 💪 https://t.co/e4Y1P4XSoX
— Azarudeen (@Thisisazar) January 15, 2020
हिटमॅनचा जबरदस्त शो
The ICC ODI Cricketer of the Year award goes to the HITMAN for his stupendous show with 5 centuries in the ICC Cricket World Cup,1490 odi runs and 7 ODI centuries in 2019. @ImRo45 pic.twitter.com/unXh2NieWF
— Akram Sheikh (@akrmshkh45) January 15, 2020
मोठ्या कामगिरीबद्दल अभिनंदन
@ImRo45 Congratulations for the big achievement,
— Pradeep Roul (@pradeep_roul) January 15, 2020
बोरिवलीचा डॉन
Borivali ka don kaun? 🙊
— Habil Ahmed (@hblahmed) January 15, 2020
प्रत्येक गोष्टीस पात्र आहे!
Congratulations Rohit Sharma n the fans! He deserves evet bit of it! He was fabulous last yr! Who can forget his performance in the last World cup... that was something else😊
— The Great Asim (@Stalker53565355) January 15, 2020
ओळख पात्र!
Many Congratulations @ImRo45 for being awarded as #ICC ODI Cricketer of the Year 2019!!🤩😎👌🏻👏👏
You truly deserves the grand recognition!#iccawards
— ONKAR DHONGADE (@onkard007) January 15, 2020
2019 विश्वचषकमध्ये दाखवलेल्या खेळाडू वृत्तीची विराटला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार जाहीर झाला. इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारा अष्टपैलू बेन स्टोक्स याची प्लेअर ऑफ दी इयर म्हणून निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 2019 मध्ये 59 विकेट घेऊन वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू ठरला. इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन याला देण्यात आला. तर, टी-20 मध्ये परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार भारतीय फिरकीपटू दीपक चहर याला मिळाला.