काही वर्षांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर खूप आक्रमक असायचा, ज्याचा फायदा विरोधी संघाने घेतला. तो तरूण होता आणि कोणत्याही गोष्टीवर फार लवकर रागवायचा. इंग्लंडचे माजी सलामीवीर निक कॉम्पटन (Nick Compton) यांनी सांगितले की जेव्हा तो कोहलीच्या एक्स-गर्लफ्रेंडशी बोलला तेव्हा भारतीय कर्णधार चिडला आणि त्याने संपूर्ण मालिकेमध्ये संताप व्यक्त करत होता. त्यावेळी कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची भेट झाली नव्हती. ही घटना 2012 ची आहे जेव्हा इंग्लंडने संघ (England Team) भारताच्या (India) दौर्यावर आला होता. 2012 पूर्वी कोहली इंग्लंड दौर्यावर असलेल्या ब्राझील मॉडेल इजाबेला लिटेला डेट करत होता. इंग्लंडचे माजी कर्णधार कॉम्प्टन म्हणाले की, या मालिकेदरम्यान तो केविन पीटरसन, युवराज सिंह बरोबर एका संध्याकाळी फिरत होता आणि कोहलीची मैत्रीणही तिथे हजर होती. निक यांच्या म्हणण्यानुसार, ते इजबेलाशी बोलले, जो कोहलीला आवडले नाही आणि मैदानावर फलंदाजीसाठी आल्यावर त्याने कॉम्पटन टोमणे मारून हैराण केले. (विराट कोहली याने टी-20 क्रिकेटमध्ये पूर्ण केली 10 वर्ष, ट्विटरवर #10YearsofKingKohliInT20s ट्रेंड)
कॉम्पटन"एज आणि स्लेजेस" पॉडकास्टवर म्हणाला, “मला मालिकेदरम्यान विराट कोहलीकडून काही शब्द ऐकायला मिळाले. मला वाटतं मालिकेच्या आधी मी त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत बोललो. युवराज सिंह, मी आणि केविन पीटरसनउपस्थित होतो. आम्ही सर्व तिथे होतो आणि ती तिथेच होती." तो पुढे म्हणाला की, "आणि मी नुकतीच तिच्याशी गप्पा मारल्या. आणि मला असे वाटते की हा शब्द परत आला की मी तिच्याशी बोलत होतो आणि विराटला त्यापासून खूप आनंद झाला असे मला वाटत नाही. जेव्हा जेव्हा मी फलंदाजीसाठी आलो तेव्हा मला काही बोलण्यासाठी त्याच्याकडे काही शब्द होते असे मला वाटते."
"मला वाटते की तो ती त्याची प्रेयसी आहे असे म्हणण्याचा प्रयत्न करीत होता आणि ती तो तिचा माजी प्रियकर होती असं म्हणत होती, म्हणून असं होतं की, इथली कथा कोणाला मिळाली? त्यावेळी ते खूपच गमतीशीर होते, मला वाटते." दरम्यान, यानंतर निकने या घटनेचा फायदा उठवण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करताना कोहलीला स्लेज करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कोहलीवर परिणाम झाला नाही. कॉम्प्टन म्हणाला, "आम्ही याचा वापर कोहलीला बाद करण्यासाठी केला. पण तुम्हाला माहिती आहे की तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. शेवटच्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. त्याची कारकीर्द अजून मजबूत होत गेली."