IND vs SL 3rd T20I: श्रीलंकाविरुद्ध पुणे टी-20 सामन्याआधी विराट कोहली याने शेअर केली शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबतची सेल्फी
विराट कोहलीने शेअर केली शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजासोबत सेल्फी (Photo Credits: Twitter)

श्रीलंका (Sri Lanka)विरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यांमध्ये विजय नोंदविल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि संघ मालिकेच्या तिसर्‍या आणि अंतिम सामन्यासाठी पुण्याला रवाना होत आहे. भारतीय कर्णधाराने ट्विटरवर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यासोबत एक फोटो शेअर केला असून त्यात “पुणे” असे कॅप्शन दिले आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर झालेल्या-विकेट्सच्या विजयानंतर आणि मालिका जिंकण्याच्या दृष्टीने टीम इंडिया निश्चितच सज्ज आहे. दुसर्‍या संघर्षात कोहली स्वत: चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. गुवाहाटीमधील सामन्यात त्याने 17 चेंडूत 30 धावा केल्या आणि अखेरीस एका शानदार षटकारासह भारताचा विजय निश्चित केला. त्याच्या खेळीच्या दरम्यान, कोहलीने काही मोठे शॉट्स खेळले आणि प्रतिष्ठित विक्रमही मोडकळीस आणले. भारत आणि श्रीलंकामधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. (IND vs SL 2nd T20I: रोहित शर्मा याला मागे टाकत विराट कोहली नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड, एमएस धोनी याच्यासह 'या' एलिट यादीतही झाला समावेश, वाचा सविस्तर)

दरम्यान, श्रीलंकाविरुद्ध पहिली धाव फटकावून कोहलीने रोहित शर्माच्या 2633 टी -20 धावांचा टप्पा ओलांडला आणि खेळाच्या सर्वात छोट्या स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कर्णधार म्हणून 1,000 टी-20 धावा करणारा तो वेगवान फलंदाज ठरला. विराटने फक्त 30 डावांमध्ये हा टप्पा गाठला. गोलंदाजीत शार्दुल ठाकूर याने प्रभावी कामगिरी केली. ठाकूरने 3 गडी बाद केले. इंदौरमध्ये अष्टपैलू प्रदर्शनामुळे यजमान संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल आणि पुण्यातही ते अश्याच प्रभावी प्रदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

पाहा विराटची पोस्ट:

पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, आणि शुक्रवारी पुणेमध्ये होणाऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्याचा त्यांचा निर्धार असेल. दुसरीकडे, तिसरा सामना जिंकून मालिका ड्रॉ करण्यासाठी श्रीलंकन लायन्सही प्रयत्नशील असतील.