
Virat Kohli Instagram Post for Indian Army: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक भावनिक पोस्ट पोस्ट केली. पाकिस्तानी सैन्याच्या नापाक कारवायांना भारतीय सैन्य सतत चोख प्रत्युत्तर देत आहे. गुरुवारीही पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले, जे भारतीय सैन्याने पाडले. विराट कोहलीने पोस्ट करून लिहिले की, "आम्ही आमच्या सशस्त्र दलांसोबत एकजुटीने उभे आहोत आणि या कठीण काळात आमच्या देशाचे रक्षण केल्याबद्दल त्यांना सलाम करतो. आमच्या वीरांच्या अटल शौर्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमच्या महान राष्ट्रासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो." कोहलीने जय हिंद लिहून आणि भारतीय ध्वज जोडून ही पोस्ट शेअर केली.
View this post on Instagram
कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर लिहिले की, "या कठीण काळात आमचे नायकांसारखे रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांचे आम्ही नेहमीच आभारी आहोत. त्यांच्या बलिदानाबद्दल त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार."
View this post on Instagram