जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध टी-20 मालिकेचा अंतिम सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात 78 धावांनी विजय मिळवत भारताने (India) मालिका 2-0 ने जिंकली. गुवाहाटीतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, तर भारताने इंदोर टी-20 सामना 7 विकेट्सने जिंकला. पुण्यातील सामन्यात भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत 201 धावा केल्या. केएल राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतक ठोकले. श्रीलंकेच्या लक्षन संदकनने सर्वाधिक 3 गडी बाद केले, लाहिरू कुमारा आणि धनंजय डी सिल्व्हाने प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. भारताने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंका संघ 123 धावांवर ऑल आऊट झाला. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) याने भारताकडून 3 गडी बाद केले आणि मॅन ऑफ द सीरिजचा मानकरी ठरला. (Video: संजू सॅमसन याने श्रीलंकाविरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला पाहून विराट कोहली राहिला स्तब्ध)

भारत आणि श्रीलंकामधील या सामन्यात बरेच रेकॉर्ड बनले. जाणून घ्या:

1. संजू सॅमसन याने अखेरचा टी-20 सामना 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. सॅमसनला 73टी-20 सामन्यानंतर सामना खेळण्याची संधी मिळाली आणि हा भारतीय विक्रम आहे. यापूर्वी, उमेश यादव याच्या 2 सामन्यांमध्ये 65 सामन्यांचा फरक होता. विश्व क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड इंग्लंडच्या जो डेन्ली याच्या नावावर आहे.

2. शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यात 97 धावांची भागीदारी झाली. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमधील या दोघांमधील ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

3. धवनने 52 धावांची खेळी केली आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे दहावे अर्धशतक होते. पुण्यातील या मैदानावरआंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो भारताचा पहिला फलंदाज आहे.

4. क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूपात 250 चौकार गाठणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला. कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 17 चेंडूत 26 धावा केल्या आणि त्याच्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. टी -20 क्रिकेटमध्ये चौकारांच्या बाबतीत रोहित शर्मा दुसर्‍या स्थानावर आहे, ज्याच्या नावावर आजवर 234 चौकार आहेत.

5. विराट कोहलीने एका धावा केल्याबरोबरकर्णधार म्हणून 11,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. त्याने हे काम सर्वात वेगवान 196 डावांमध्ये केले आहे तर ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने 252 डावात इतक्या धावा पूर्ण केल्या आहेत.

6. या सामन्यात शार्दुल ठाकूर याने 22 धावा केल्या.आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील हा त्याचा सर्वात मोठा डाव आहे.

7. कोहलीआंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्येफक्त दुसऱ्यांदा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध मालाहाइडमध्ये सहाव्या क्रमांकावर खेळत तो खाते न उघडता बाद झाला.

8. जसप्रीत बुमराह दनुष्का गुणथिलाकाला बाद करूनआंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. हा त्याचा 53 वा विकेट होता. युजवेंद चहल आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 52-55 गडी बाद केले आहेत.

9. धनंजया डी सिल्वा याने 57 धावा फटकावल्या.आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते.

10. द्विपक्षीय टी -20 मालिकेमध्ये भारतीय संघ अद्याप श्रीलंकेविरूद्ध अजिंक्य आहे. 7 मालिकेतील हा भारतीय संघाचा 6 वा विजय आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. शिवाय, श्रीलंकाविरुद्ध भारताने टी-20 मध्ये 13 वा विजय होता, जो कोणत्याही संघाविरुद्ध भारताचा सर्वाधिक विजय आहे.

सलामी फलंदाज राहुल आणि धवनकडून शानदार सुरुवात झाल्यानंतर गोलंदाजांनी सामर्थ्य दाखवले आणि शुक्रवारी पुण्यातील मालिकेच्या तिसर्‍या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने 78 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. श्रीलंकेने पॉवरप्लेमध्येच पहिले चार गडी गमावले. धनंजय डी सिल्वा आणि एंजेलो मॅथ्यूज यांनी पाचव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी करुन श्रीलंकेच्या आशा कायम ठेवल्या होत्या. या दोघांची भागीदारी तोडल्यावर श्रीलंका संघ 15.5 ओव्हरमध्ये 123 धावावर ऑल आऊट झाला.