Virat Kohli IPL 2022: भारतीय क्रिकेट चाहत ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेरीस आज आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. शनिवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले. कोहलीने आपल्या डावात 58 धावा केल्या, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट फक्त 109.43 होता. विराटने या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र कोहली अर्धशतकाचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला. मोहम्मद शमीने विराटला त्रिफळा उडवून त्याच्या खेळीवर ब्रेक लावला. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 मधील कोहलीचे हे 43 वे आणि सध्याच्या आवृत्तीतील त्याचे पहिले अर्धशतक होते. (Ravi Shastri on Virat Kohli: बस झालं...‘विराट कोहली खूप खचला आहे’, शास्त्री गुरुजींचं मोठं वक्तव्य; आणखी 6-7 वर्षे खेळण्यासाठी ‘हे’ करण्यास सांगितले)
त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळापैकी एक पार केल्यानंतर फॉर्ममध्ये परत आल्याबद्दल चाहत्यांनी कोहलीचे अभिवादन केले. मात्र, अनेक सोशल मीडिया यूजर्सनी कोहलीला त्याच्या सुस्त 110 स्ट्राईक रेट खेळीसाठी खडेबोल सुनावले. काहींनी तर त्याची तुलना सचिन तेंडुलकरच्या बांगलादेशविरुद्धच्या 100 व्या शतकाशीही केली, जी अजूनही मास्टर-व्लास्टरच्या कारकिर्दीवरील एक डाग आहे.
5⃣0⃣ for @imVkohli! 👏👏
43rd #TATAIPL fifty for the #RCB opener! 👍
Follow the match ▶️ https://t.co/FVnv8ovvEQ #GTvRCB pic.twitter.com/OnYAutfN8H
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2022
सचिनने 100 व्या शतकासाठी केले
SRT at least did this for his 100th 100. Kohli doing it in a random IPL game. And people applauding *this* knock. Lol.
— Swaroop Swaminathan (@arseinho) April 30, 2022
टी-20 मध्ये चांगली फलंदाजी नाही
Run 58 Ball 53
109 strike rate
It's not good batting in T20 🏏
Especially first batting
— சரவணன் ரெத்தினசாமி (@SaravananR1999) April 30, 2022
कोहली मनीष पांडे स्ट्राइक रेटने फटकेबाजी करतोय
Virat Kohli is striking at Manish Pandey Strike rate.. #GTvRCB #GTvsRCB
— Rao.. #ProudHindu 🇮🇳 (@bubblebuster26) April 30, 2022
आयपीएल 2022 मध्ये विराट कोहली खराब फॉर्मसाठी संघर्ष करत होता, मात्र या सामन्यात विराटने सुरुवातीपासूनच पुनरागमनाची घोषणा केली. कोहलीचे या मोसमातील हे पहिलेच अर्धशतक असून 15 डावांनंतर विराटने हा पल्ला गाठला आहे. या सामन्यापूर्वी विराट दोनदा गोल्डन डकवर आऊट झाला होता. इतकंच नाही तर कोहलीला चाहते आणि दिग्गजांकडून सतत काही काळ विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला जात होता. पण यादरम्यान त्याने पुनरागमन करत अर्धशतक ठोकून फॉर्ममध्ये परतण्याची घोषणा केली.