भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली (Virat Kohli) बाबत मोठे वक्तव्य केले आहे. कोहलीला पुढील सहा-सात वर्षे देशासाठी खेळायचे असेल तर त्याने विश्रांती घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. शास्त्रींच्या म्हणण्यानुसार मानसिक थकवा दूर करण्यासाठी विराटने क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घ्यावी आणि नंतर मैदानात परतावे. कोहलीला बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही सामन्यात मोठी खेळी करता आलेली नाही. याचा भारताच्या कामगिरीवरही परिणाम झाला असून टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 गमावल्यानंतर टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेकडून एकदिवसीय आणि टी-20 मालिकाही गमावली. कोहली आयपीएल 2022 मध्ये अडचणीच्या स्थितीतून जात आहे. यावर शास्त्री यांनी भारताच्या इंग्लंड दौर्यापूर्वी (India Tour of England) किंवा नंतर कोहलीला विश्रांती देण्याची सूचना शास्त्रींनी केली आणि सुचवले की सततच्या तपासणीत आणि अपेक्षांच्या ओझ्यांमध्ये RCB स्टारचा मेंदू तापलेला आहे. (IPL 2022: रवी शास्त्री यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले - IPL ला मिळणार नवा चॅम्पियन; RCB च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यावर केले मोठे विधान)
मंगळवारी आयपीएल 2022 च्या 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या लखनौ सुपर जायंट्सवर विजयी सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. कोहलीने वाइड चेंडूवर बॅट वळवली आणि पॉईंटवर झेलबाद झाला. यामुळे स्टार फलंदाज हताश दिसला. शास्त्रींच्या मते, कोहली मानसिकदृष्ट्या खचला आहे. त्यामुळे तो धावा करू शकत नाही. आयपीएलच्या चालू हंगामात विराटला सात डावांत केवळ दोनदा 40 हून अधिक धावा करता आल्या आहेत. तसेच जर सर्व फॉरमॅटबद्दल बोलायचे तर गेल्या 100 डावांमध्ये त्याने एकही शतक केलेले नाही. यादरम्यान, त्याने भारताच्या टी-20 आणि कसोटी संघांचे कर्णधारपद सोडले, तर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. यापूर्वी त्याने आरसीबीचे कर्णधारपदही सोडले होते.
“मी थेट येथील मुख्य व्यक्तीकडे जात आहे. विराट कोहली जास्त खचला आहे. जर कोणाला विश्रांतीची गरज असेल तर तो आहे,” रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले. “मग ते 2 महिने असो किंवा दीड महिना, मग ते इंग्लंडनंतर असो किंवा इंग्लंडच्या आधी. त्याला विश्रांतीची गरज आहे कारण त्याच्यामध्ये 6-7 वर्ष अजून क्रिकेट शिल्लक आहे आणि तुम्हाला ते गमावायचे नाही, पकलेला मेंदू. तो एकटाच नाही. जागतिक क्रिकेटमध्ये 1 किंवा 2 जण अशाच परिस्थितीतून जात असतील. तुम्हाला ही समस्या आधीच दूर करण्याची गरज आहे,” शास्त्री म्हणाले. आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीकडून आयपीएल 2022 मध्ये खूप अपेक्षा होत्या. तथापि, कोहलीला संघर्ष करावा लागत आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने 7 सामन्यांत 19.83 च्या तुटपुंज्या सरासरीने केवळ 119 धावा केल्या.