Virat Kohli 48th ODI Century: बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीने ठोकले 48 वे वनडे शतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या 26 हजार धावा पूर्ण
Virat Kohli (Photo Credit - Twitter)

विश्वचषक 2023 च्या 17 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातला सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने 7 गडी राखुन बांगलादेशचा पराभव करत विश्वचषकात विजयाच चौकार लगावला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज आणि आधुनिक मास्टर विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 48 वे शतक आणि एकदिवसीय विश्वचषकातील तिसरे शतक झळकावले. यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरपासून विराट एक पाऊल दूर राहिला आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध 97 चेंडूत शतक पूर्ण केले. या विश्वचषकात त्याने दोन अर्धशतकांसह एक शतक झळकावले आहे. त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांसह 103 धावांची नाबाद खेळी खेळली.

विश्वचषक 2023 मध्ये विराट कोहलीची अप्रतिम कामगिरी

या शानदार खेळीसाठी विराट कोहलीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. यासह त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात 4 सामन्यात 259 धावा केल्या आहेत. दोन डावात तो नाबाद राहिल्याने त्याची सरासरी उत्कृष्ट आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 84, अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 55, पाकिस्तानविरुद्ध नाबाद 16 आणि आता बांगलादेशविरुद्ध नाबाद 103 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानंतर विराट दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहित शर्माने याच सामन्यात सर्वाधिक 48 धावा करत 265 धावा केल्या. (हे देखील वाचा: Rohit Sharma 5 Records: रोहित शर्माचे अर्धशतक हुकले, तरीही केली विक्रमांची मालिका, पाहा 5 मोठे विक्रम)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या 26 हजार धावा पूर्ण 

यासह विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 25923 धावा होत्या. आता 26 हजार धावा करणारा तो जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय विराट कोहलीने सर्वात जलद 26 हजार धावा करण्याचा विक्रमही केला आहे. विराट कोहलीने वनडे विश्वचषकात तिसरे शतक झळकावून शिखर धवनची बरोबरी केली. या यादीत रोहित शर्मा 7 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने 6 आणि सौरव गांगुलीने 4 शतके झळकावली आहेत.

विश्वचषकात भारताचा सलग चौथा विजय

या सामन्यात भारतीय संघाने सलग चौथा विजय नोंदवला. भारत आणि न्यूझीलंड हे एकमेव संघ अजिंक्य आहेत. पण उत्तम नेट्रन रेटमुळे किवी संघ अव्वल आहे. टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचेही 8 गुण आहेत. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव केला होता.