Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

विश्वचषक 2023 च्या 17 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात सामना होत आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारतासमोर 257 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बांगलादेशविरुद्ध भारताने शानदार सुरुवात केली आहे. 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने डावाची सुरुवात तुफानी पद्धतीने केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधारपदाची खेळी खेळताना पुन्हा एकदा षटकार आणि चौकार लगावले. मात्र, रोहितचे अर्धशतक हुकले आणि तो 48 धावांवर झेलबाद झाला. अर्धशतक हुकले तरी रोहित शर्माने आज 5 मोठे विक्रम केले आहेत. वाचा बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माने कोणते 5 मोठे विक्रम केले आहेत.

रोहित शर्माने आज 5 मोठे विक्रम केले

रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध 40 चेंडूत 48 धावांची खेळी केली होती. या खेळीत रोहितने 7 चौकार आणि 2 षटकारही मारले आहेत. या छोट्या खेळीनंतर रोहितने 5 मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

रोहित शर्मा आयसीसी विश्वचषक 2003 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. 4 सामन्यात 265 धावा करत रोहित पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. (हे देखील वाचा: Ravindra Jadeja बनला 'सुपरमॅन' आणि घेतला आश्चर्यकारक झेल, पाहा Video)

याशिवाय आशियामध्ये खेळताना 6000 धावा करणारा रोहित शर्मा हा सातवा फलंदाज ठरला आहे. रोहितने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा तिसरा विक्रम केला आहे. पाठलाग करताना रोहितने 13 सामन्यांत सर्वाधिक ७७१ धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम शाकिब अल हसनच्या नावावर होता.

रोहित शर्माने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारून चौथा विक्रम केला आहे. रोहितने एका वर्षात 61 षटकार मारून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. रोहितने 61 षटकार मारून इंग्लंडचा फलंदाज इऑन मॉर्गनचा विक्रम मोडला आहे. मॉर्गनने एका वर्षात 60 षटकार मारले होते.

याशिवाय रोहित शर्मा विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. रोहितने विश्वचषकातील 21 डावांमध्ये 1226 धावा केल्या आहेत.