Ravindra Jadeja Catch Video: भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवले आहे. पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात जडेजा सुपरमॅन बनताना दिसला. त्याने डायव्हिंग करत मुशफिकर रहीमचा अप्रतिम झेल घेतला. भारताविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डावाच्या 43व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने मुशफिकर रहीम (38) याला जडेजाकडून झेलबाद केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)