भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामन्यात मोठा विक्रम करू शकतो. जर त्याने आणखी 42 धावा केल्या तर तो भारतातील कसोटी सामन्यांमध्ये 4000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील होईल. याआधी भारताचे मोजकेच खेळाडू हे पराक्रम करू शकले आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली होती, परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चौथी कसोटी जिंकून भारतीय संघ मालिका विजयासह कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final) प्रवेश करू इच्छितो.
विराट कोहली 42 धावा करताच करेल मोठा विक्रम
या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडेही सर्वांच्या नजरा असतील. त्याची बॅट अजून तशी चाललेली नाही. या कारणास्तव त्याला या शेवटच्या कसोटी सामन्यात आपल्या बॅटने दमदार कामगिरी करायला आवडेल. दुसरीकडे, या सामन्यात किंग कोहलीने 42 धावा केल्या तर भारतातील कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा तो केवळ 5 वा भारतीय फलंदाज ठरेल. आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th Test: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले स्टेडियमवर, दोन्ही संघांच्या कर्णधारांचा केला सन्मान (Watch Video)
फलंदाजांमध्ये विराट कोहलीची सरासरी सर्वाधिक
जर कोहलीने पहिल्या डावातच ही कामगिरी केली तर तो राहुल द्रविड आणि गावस्कर यांना मागे टाकून 4000 कसोटी धावा पूर्ण करणारा भारतातील तिसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरेल. गावसकरने 87 डावात आणि द्रविडने 88 डावात, तर कोहलीने 76 डावात 3958 धावा केल्या आहेत. या यादीतील सर्व फलंदाजांमध्ये विराट कोहलीची सरासरी सर्वाधिक आहे. विराट कोहलीने 58 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.